Lok Sabha Election | आमदारकीचे तिकीट हवे असेल तर लीड द्या; भाजपची नवी ऑफर..?

0
27
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असून, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महाराष्ट्रात भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारांची योग्य निवड, प्रत्येक मतदार संघांत सर्व्हे यामुळे भाजपने ‘मिशन 45 प्लस’ गांभीर्याने घेतल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपने आपल्या आमदारांना एक विशेष टार्गेट दिलं असून, जो आमदार हे टार्गेट पूर्ण करणार नाही. त्याचे आमदारकीचे तिकीट धोक्यात येणार आहे. (Lok Sabha Election)

जो आमदार महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराला आपल्या विधानसभा मतदार संघातून लीड देईल त्याला पुन्हा तिकीट दिले जाईल आणि ज्यांच्या मतदारसंघातून लीड मिळणार नाही. त्याचं आमदारकीचं तिकीट धोक्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित आमदारांचे लोकसभेच्या उमेदवारांशी कितीही मतभेद असले किंवा उमेदवार मान्य नसेल. मात्र, तरीही स्वतःचे विधानसभेच्या तिकीट वाचवण्यासाठी आमदारांना उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार आहे.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. चड्डा यांच्या प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. तर, दुसरीकडे आता भाजपने चक्क आपल्या आमदारांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक केलं आहे.(Lok Sabha Election)

Lok Sabha Election | पाच वर्ष कुठे होतात..?; भाजप आमदाराला गावकऱ्यांनी झापले

Lok Sabha Election | आमदाराचं रिपोर्ट कार्ड तयार केलं जाणार 

विशेष म्हणजे भाजप नेत्यांनी आपल्या आमदारांना केवळ टार्गेटच दिलं नाहीये. तर, त्यांच्या या कामावरून प्रत्येक आमदारांचं रिपोर्ट कार्डही तयार केलं जाणार आहे. आमदारांच्या कामाचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचं मूल्यमापन या रिपोर्ट कार्डद्वारे केलं जाणार आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि विधानसभेसाठीच्या इच्छुक उमेदवारांना त्याबाबतच्या सूचनाच दिल्या आहेत.  (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | ‘या’ नेत्यांसाठी निवडणूक अवघड; राऊतांनी केले भाकीत..?

काम दाखवा मग आमदारकीचे तिकीट घ्या 

या लोकसभा नवडणुकीच्या काळात ज्या आमदाराची कामगिरी चांगली असेल. त्याला तिकीट दिलं जाईल असे नवीन धोरण भाजपने राबविलेल्याचं दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीतही चांगली काम करणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे गाजर भाजपने दाखवले असून, आता यामुळे आपले तिकीट वाचवण्यासाठी आमदार जोमाने कामाला लागले आहेत.(Lok Sabha Election)

त्यामुळे महायुतीने दिलेल्या लोकसभा उमेदवारासोबत आमदारांचे कितीही मतभेद असले किंवा वाद असले किंवा दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका असेल. तरी स्वतःच्या विधानसभेच्या तिकीटासाठी तरी आमदारांना त्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे आणि त्यांना आपल्या मतदार संघातून लीडही मिळवून द्यावी लागणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here