सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | – येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २४ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ संपन्न झाला. प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे कर्तव्य तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य, चिन्ह इ. विषयी मार्गदर्शन केले.
Deola | शिवनिश्चल ट्रस्ट हा राज्यातील अनाथांचा मोठा आधार- प्रवीण गायकवाड
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘रा. से. यो.’ वरदान
यावेळी भदाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे सिद्धांत वाक्य जे आहे, ‘मला नाही तुम्हाला’ यामागे नि:स्वार्थ सेवाभाव आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच श्रममूल्य जपण्यासाठी रासेयो वरदान ठरली आहे, यातील स्वयंसेवक एक कुशल नेता, कुशल प्रशासक तसेच समाजसेवक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, डॉ. बनसोडे, प्रा.काकवीपुरे, प्रा. सोनवणे यांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे व डॉ. राकेश घोडे व स्वयंसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम