सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने इतिहास घडवला त्याच पद्धतीने होऊ घातलेल्या देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहून लोकसभे प्रमाणे विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने देवळा येथे सोमवारी दि. २३ रोजी रात्री आठ वाजता पाच कंदीलवर शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत या यात्रेचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते.
Deola | सुराणा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश
शिवस्वराज्य यात्रेला यांनी लावली हजेरी
यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, रोहिणी खडसे उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, मविप्र संचालक विजय पगार ,माजी संचालक डॉ.विश्राम निकम, युवा नेते सुनील आहेर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, उमरणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, प्रा सतीश ठाकरे, लोकनियुक्त सरपंच स्वप्नील पाटील, नगरसेविका ऐश्वर्या आहेर, अरुणा, खैरनार, वैशाली खोंडे, नीलिमा आहेर, माणिक पगार, गोविंद पगार, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, काँग्रेसचे स्वनिल सावन्त, दिनकर आहेर, विश्वनाथ गुंजाळ, संजय गायकवाड, प्रशांत निकम, बाळासाहेब मगर , आर एन शिरसाठ, धनंजय बोरसे, बापू देवरे, अमोल देवरे, चिंतामण आहेर, जगन आहेर, ललित निकम, किशोर खरोटे, ॲड तुषार शिंदे, मयूर सोनवणे, दत्तू आहेर, पंकज आहेर, सतीश आहेर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम