सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील माजी आमदार कै. शांताराम तात्या आहेर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांन पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल असुन संघा मार्फत शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो, त्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी ही संघा मार्फत करावी व संघास सहकार्य करावे असे आवाहन देवळा बाजार समितीचे सभापती व संघाचे जेष्ठ संचालक योगेश आहेर यांनी केले. शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघाचे चेअरमन संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, यात जितेंद्र आहेर, अतुल आहेर, दिपक देवरे, दिलीप पाटील, प्रदिप आहेर, गोरख सोनवणे, महेंद्र आहेर, डॉ. कीरण आहेर, विजय सोनवणे आदींनी चर्चेत सहभाग घेतला व सभासदांनी विषय पत्रिकेतील सर्व विषयांना मंजुरी दिली.
Deola | सुराणा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश
सचिव गोरक्षनाथ आहेर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संघाच्या व्हा. चेअरमन अर्चना आहेर, संचालक चिंतामण आहेर, अमोल आहेर, डॉ. राजेंद्र ब्राह्मणकार, कैलास देवरे, काशिनाथ पवार, रविंद्र जाधव, नानाजी आहेर, सुलभा आहेर, हंसराज जाधव, सुवर्णा देवरे, साहेबराव सोनजे, चेतन गुंजाळ, सचिन सुर्यवंशी, विनोद देवरे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम