Deola | शिवनिश्चल ट्रस्ट हा राज्यातील अनाथांचा मोठा आधार- प्रवीण गायकवाड

0
20
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | प्रेरणा आणि विचार बदलले तर समाज घडतो, अन सक्षम समाज व राष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने रविवार (दि. २२) रोजी देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.गायकवाड श्रोत्यांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले कि, अनाथ मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले कायम सहकार्य असेन. प्रत्येकाने अशा कार्याला बळ द्यायला हवे.

Deola | ‘लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘मविआ’ला प्रचंड मताधिक्याने विजयी करा’; डॉ. अमोल कोल्हेंचे नागरिकांना आवाहन

अनाथ व निराधार मुलांना शालेय साहित्य व धनादेशाचे वाटप

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.के. आहेर यांनी केले. यावेळी ३२ अनाथ व निराधार मुलांना शालेय साहित्य व धनादेश देत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषद करतांना सांगितले की, “विचार रुजवण्यासाठी व चळवळ टिकवण्यासाठी असे कार्यक्रम घेत समाजाची जडणघडण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही १२९ अनाथ व निराधार मुलांचे पालकत्व निभावत आहोत.” यावेळी हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले. खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर , डॉ. दिनेश बच्छाव, राजेंद्र देवरे, भाऊसाहेब आहिरे यांनी आपल्या मनोगतातून या मदतनिधी उपक्रमाचे कौतुक केले.

“खिशात पैसा नसला तरी चालेल मात्र डोक्यात छत्रपतींचे विचार अआवेत”- निलेश लंके

यावेळी दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके म्हणाले की, “खिशात पैसा नसला तरी चालेल मात्र डोक्यात छत्रपती शिवरायांचे विचार असावेत. यामुळे समाजात आदर्शवत काम उभे करण्याची प्रेरणा मिळते व माणसात देव असल्याचे त्यांनी सांगितले. गौरव मोरे यांनी “संवेदना जागविणारा हा उपक्रम व कार्यक्रम असून असे सामाजिक काम करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली आहे.” असे म्हणत मनोगत व्यक्त केले.

शाहिरी गीते व पोवाडे सादर करीत कार्यक्रमाला सुरुवात

कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. मशाल प्रज्वलित करत व मदतनिधी वितरणाची चित्रफित दाखवत कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे, माजी सभापती विलास देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, चांदवडचे डॉ. आत्माराम कुंभार्डे, कळवण एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस भूषण पगार, मविप्र संचालक विजय पगार, सपोनि दिपक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी व भगवान आहेर यांनी केले तर प्रा. गोसावी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिलावर्गासह येथील व राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनिश्चल कोअर कमिटीचे भगवान आहेर, डॉ. सुनील आहेर, पंकज जाधव, अनिल भामरे व इतर स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Deola | सुराणा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश

रवींद्र गोसावी व यतीन दादा पगार मित्र परिवाराकडून एक लाखांचा धनादेश

कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिध्द उद्योजक दादासाहेब सूर्यवंशी यांनी अनाथ व निराधार मुलांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यातील खारीपाडा येथे शिवनिश्चल ट्रस्टला सहाय्यक म्हणून दोन एकर जागा व अशा मुलांसाठी वसतिगृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. तर सटाणा येथील रविंद्र गोसावी व यतीन दादा पगार मित्रपरिवाराच्या वतीने एक लाखांचा धनादेश अशा मदतीसाठी देण्यात आला. इतरही काही मंडळ व संस्थांनी आर्थिक मदत यावेळी जाहीर केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here