Nashik Bus Accident | नाशिकमध्ये पिनॅकल मॉल येथे शिवशाही बस ने तीन दुचाकी तसेच एका चारचाकीला फरफटत नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी शिवशाहीची तोडफोड केल्याची माहिती आता समोर येते आहे. तर पोलिसांकडून चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे.
Nashik News | नाशकात कांचणे धरणात बुडून युवकाचा मृत्यू
ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा
तर प्रत्यक्षदर्शी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही चालकाने सिग्नल पासून मॉल पर्यंतच्या रस्त्यावर चार ते पाच वाहनांना फरफटत आणल्याचे सांगितले जाते. MH.09 EM.1279 हा बसचा वाहन क्रमांक असून अतिशय वर्दळीच्या व रदारीच्या मार्गात ही घटना घडल्याने संतप्त नागरिकांनी गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली. यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. तर चालकाकडून ब्रेक फेल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या मते गाडीचे ब्रेक फेल नसल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम