Nashik News | नाशकात कांचणे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

0
58
#image_title

Nashik News | सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील कांचणे शिवारात नागोणे धरणात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत आता देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nashik Crime | धक्कादायक! चांदवडमध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

मासे पकडण्यासाठी गेला असता झाला मृत्यू

देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील कांचणा येथील संदीप काबू पिंपळे हा विवाहित तरुण रविवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजायच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या नागवणे धरणात मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याला तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची खबर लागतात येथील पोलीस पाटील दिगंबर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत सोमवारी दिनांक 23 रोजी सकाळी दहा वाजता स्थानिकांच्या मदतीने संदीपला धरणातून बाहेर काढले. यानंतर त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत संदीप पिंपळे यांच्या कुटुंबात आई, वडील पत्नी आणि दोन आपत्य (मुलगा-मुलगी) आहेत. या घटनेनंतर कांचणे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here