Nashik Crime | शहरातील कॉलेज रोड परिसरात सोमवार दिनांक 23 रोजी दुपारच्या सुमारास जुन्या भांडणाच्या रागातून एकाने 25 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला. तरुण रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडताच हल्लेखोराने तिथून पळ काढला. याबाबत आता सना मोअज्जमखान पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime | मृतदेहाजवळ पूजा केल्याच्या अघोरी घटनेने नाशकात खळबळ
नेमके प्रकरण काय?
फिर्यादी पठाण कुटुंबीय मुल्लावाडा परिसरात राहत असून त्यांच्या शेजारील घासी कुटुंबासोबत सातत्याने भांडण होत असते. त्यातूनच संशयीत अबुजर मन्जूर घासी, मोबीन अखिल घासी व मिजान अखिल घासी हे तिघे सोमवारी लोखंडी रॉड व कोयता हाती घेत पठाणला शिवीगाळ आणि दमदाटी करून निघून गेले होते. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ अरबाज हा कॉलेज रोड येथे असताना अबूजर घासीने धारदार कोयत्याने त्याच्यावरती वार केला व घटनास्थळावरून पळ काढला.
Nashik Crime | नाशकात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; पोलिसांकडून तासाभरात कारवाई
त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचत जखमी अरबाजला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अरबाजला नाशिकला हलविण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात दहशत पसरली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर सारखेगावकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम