सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील ओमनगर (मालेगाव रोड) येथे मंगळवार (दि. २९) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडीच्या दोन घटना घडल्या. यात अज्ञात चोरटयांनी सोने-चांदीचचे दागिने धरून ६८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. शहरातील उपनगरात वारंवार अशा छोट्या मोठया चोरीच्या घटना वारंवार घडत असून, ऐन दिवाळीच्या सणात या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Deola | चांदवड-देवळा मतदारसंघातून केदार आहेरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने केला हात साफ
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील मालेगांव रोड वरील ओमनगर परिसरात राहणारे अमोल नरेंद्र आहेर हे बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मंगळवारी दि. २९ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील असलेल्या कपाटात व बेडमधील साहित्य अस्ताव्यस्त करत तेथे ठेवलेले सोनेचांदीचे दागिने लंपास केले. ६८ हजारांपेक्षा जास्त रकमेचा असा ऐवज व मुद्देमाल हडप केला. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी कडीकोंडका तुटलेला दिसल्याने तातडीने घरमालकाला याची कल्पना दिली. अजून दुसऱ्या घरातही चोरांनी असाच प्रवेश केला मात्र तेथून त्यांना फारसे काही हाती लागले नाही.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेची खबर अमोल आहेर यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. भर वस्तीत ही धाडसी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे का? याची चाचपणी केली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम