Deola | माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

0
29
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत येथील माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने माघारीनंतर पुढील राजकीय दिशा ठरविण्यात येणार असून, “यात बाजार समितीचे सभापती योगेश आहेर जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्याना मान्य राहील” असा एकमूखी ठराव रविवारी दि. २७ रोजी येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जीभाऊ वाघ होते. यावेळी हिरामण आहेर, हरिभाऊ परदेशी, अतुल आहेर, जगदीश पवार, डॉ. राजेंद्र ब्राह्मण कार, शिवाजी पवार, दिलीप आहेर, रवींद्र सावकार, सतिष सूर्यवंशी, गोरख आहेर, पंडितराव निकम, यशवंत शिरसाठ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Deola | भावडे येथील एसकेडी विद्यालयात राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

स्व. आहेर यांच्या स्मृती दिनानिमीत्त दरवर्षी अशा पद्धतीने बैठक घेण्यात यावी

कसमादे परिसरात माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांनी हाडाचे कार्यकर्ते तयार केले असून, खासदार शरद पवार यांचे निष्ठावंन्त पाईक म्हणून त्यांची ओळख आहे. स्व. आहेर यांच्या स्मृती दिनानिमीत्त दरवर्षी अशा पद्धतीने बैठक घेण्यात यावी, त्यानमिताने तात्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल असे मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवाराला पाठींबा द्यावा यासाठी पाच कार्यकर्त्यांची समिती स्थापन करून दि. ४ रोजी माघारीनंतर या घाटाची निर्णायक भूमिका ठरविण्यात येणार आहे.

Deola | देवळ्यात मोठी राजकीय उलथापालथ!; केदा आहेर तुतारी फुंकणार…?

या कार्यकर्त्यांनी दर्शवली उपस्थिती

बैठकीस माजी सरपंच नारायण जाधव, ह. भ. प. किसन मोरे, नानाजी मोरे, बाबुराव चव्हाण, माजी सभापती सुकदेव अहिरे, राघो आहेर, पोपट पगार, हिरामण जाधव, साहेबराव गांगुर्डे, गोविंद बर्वे, निबा चव्हाण, संजय साळवे, महेंद्र आहेर, संतोष शिंदे, बंडू परदेशी, कैलास देवरे, शरद आहेर, संजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू रौंदळ यांनी केले. आभार येशवंत शिरसाठ यांनी मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here