Deola | चांदवड-देवळा मतदारसंघातून केदा आहेरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

0
23
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा मतदारसंघात निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष, अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केदा आहेर यांनी मंगळवारी (दि. 29 ) रोजी चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात विरोधी पक्षाच्या नेत्यांना गळाला लावत शक्ती प्रदर्शनातुन भाजपच्या उमेदवारा पुठे मोठे आव्हान उभे केले. भाजपकडून इच्छुक असलेले केदा आहेर यांनी आपले चुलत बंधू विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचे समक्ष उमेदवारी करून चांदवड व देवळा तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्रित करीत चांदवड-देवळा विकासआघाडीची निर्मिती केली. भाजपकडून आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा त्यांनी या मेळाव्यात वाचून दाखवला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उत्तम बाबा भालेराव हे होते.

Deola | माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

माझ्यावर घातपात झाला. यापुढे माझे आयुष्य जनतेसाठी समर्पित करीत आहे… 

याप्रसंगी केदा आहेर पुढे म्हणाले की, “माझ्यावर पक्षाबरोबरच माझ्या भावाने देखील अन्याय केला आहे. मी जे बोलतो तेच करतो, आमदार झाल्यावर एका वर्षात चांदवड येथे देवळा येथील शिवस्मारक सारखे अहिल्या देवीचे, भीम सृष्टी व प्रत्येक आदिवासी वस्तीत स्मारक उभे करून दाखवणार आहे. पक्षाची विचारधारा सोडून सर्व जनता आज माझ्या सोबत असल्याने मला ऊर्जा मिळाली असून, माझ्यावर घातपात झाला. यापुढे माझे आयुष्य जनतेसाठी समर्पित करीत आहे. माझ्या पाठीशी हजारो भाऊ असल्याने मला कोणाची भीती नाही. सर्वांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. माझ्यावर घातपात झाला नसता, तर मी आज या संघर्षापर्यंत पोहोचलो नसतो. माझ्याकडे विकासाचे व्हिजन असल्याने येणाऱ्या काळात औद्योगिक वसाहत, बेरोजगारी, शेतकऱ्यांसाठी पूरक, प्रक्रिया व्यवसाय, महिला बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगार अशा अनेक संकल्पना माझ्या मनात आहेत.”

“पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार” – केदा आहेर

“घराणेशाही मोडून काढण्यासाठी प्रस्थापित राजकारणा विरोधात ही लढाई आहे. मी आमदार झाल्यावर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. चांदवड-देवळयाचा पूर्व भाग कायम दुर्लक्षित असून, अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार असे यावेळी त्यांनी सांगितले. विकासाच्या दृष्टीने सर्व सामन्य कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आपण उमेदवारी करीत असून, दोघेही तालुक्यातुन मिळालेली भरभक्कम साथ पहाता आपला विजय निश्चित होईल, अशी आशा बाळगून जर ते सत्यात उतरले, तर दोन्ही तालुक्यातील जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.” अशी ग्वाही देऊन या निवडणुकीत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची साथ मिळत असताना आपला उत्साह अधिक वाढला असून, आपल्या विजयात योगदान देणाऱ्यांची प्रतारणा होऊ देणार नाही. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Deola | भावडे येथील एसकेडी विद्यालयात राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न

केदा आहेरांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन

यावेळी भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे माजी आमदार उत्तम बाबाभालेराव, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, माजी सभापती राजेंद्र देवरे आदींसह पक्षाचे जोडे बाजूला ठेवून अपक्ष उमेदवार केदा आहेर यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी मच्छिंद्र बिडकर, विकास भुजाडे, संजय पाचोरकर, निवृत्ती घुले, खंडेराव पाटील, देविदास चौधरी, श्रीराम महाराज, नंदन देवरे, संजय शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here