Political News | शेखर पगारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी, सुहास कांदेवर गुन्हा दाखल

0
17
#image_title

Political News | नांदगाव येथे सोमवारी समीर भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित सभेत मराठा समाज नेते शेखर पगार यांनी भाषण केले होते. या भाषणाअंती शिंदे गटाचे उमेदवार व विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी फोनवरून शेखर पगार यांना शिवीगाळ केली होती. ही शिविगाळ पगार यांनी भर सभेत सगळ्यांना ऐकवली होती. यावेळी आई- बहिणी वरून शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Political News | नांदगावात राजकीय नाट्य; समीर भुजबळांच्या सभेत सुहास कांदेंकडून शेखर पगारांना फोनवरून शिवीगाळ

सुहास कांदेंवर गुन्हा दाखल

सदरप्रकरणी विनोद शेलार आणि शेखर पगार यांनी काल रात्री विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुहास कांदे यांनी मराठा नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना केलेल्या शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here