सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत श्री. सप्तशृंगी शिक्षण संस्था, नाशिक संचलित येथील औद्योगिक प्रशिक्षण व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथे गिरीजाई मंगल कार्यालयात बुधवार (दि.२५) रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली. या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला याचे पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
Deola | एसकेडीच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंची विभाग स्तरावर निवड
रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी राजेश कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नागरपंचायतीचे गटनेते संजय आहेर, बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, मेशी विद्यालयाचे प्राचार्य गोरख निकम, खर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष आडे, कौशल्य विकास विभागाचे अख्तर तडवी उपस्थित होते.
Deola | शिवसेना उ. बा. ठा. पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णींना आंदोलनाचा इशारा
रोजगार मेळाव्यास यांनी उपस्थिती दर्शवली
सदर मेळाव्यास ५० व्यवस्थापनांच्या विभाग प्रमुखांच्या उपस्थित विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून यातील उपस्थित ११० युवा रोजगारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. सदर मेळाव्यास श्री. साजशृंगी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर व संस्थेच्या अध्यक्षा हिमगौरी आडके-आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य एस. एन. आहेर, गट निदेशक आर. ए. पाटील, चंद्रकात भामरे, रणदिवे, उगले आदींसह शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम