सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | जून २०२३ मध्ये खरीप पीक विम्याची रक्कम मिळावी तसेच अवेळी करण्यात येणारे भारनियमन रद्द करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल ह्या इशारा व मागणीचे निवेदन सोमवारी (दि.२३) रोजी येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा कि, देवळा तालुक्यात महावितरण कंपनीच्या वतीने अवेळी ईमर्जन्सी लोडशेडिंग सुरु आहे. ऐन सायंकाळी अंधाराच्या सुमारास भारनियमन होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात सर्वत्र बिबट्यांची दहशत असून, शेतशिवारात त्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Deola | संघाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ सभासदांन पर्यंत पोहचवणार- योगेश आहेर
कृषी विभागाच्या ढोबळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष केल्याचा आरोप उबाठा गटाच्या पधाधिकऱ्यानी केला आहे. त्याच प्रमाणे गेल्या वर्षी काढलेल्या पिकविम्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कृषी विभागाच्या या गलथान कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व समस्या तात्काळ मार्गी लावण्याकामी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले. याची दखल न घेतल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा धमकी वजा ईशारा निवेदनाद्वारे यावेळी देण्यात आला. या प्रसंगी देऊन निवेदन देन्यात आले. त्याप्रसंगी तालुका प्रमुख बापू जाधव, सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, संघटक प्रशांत शेवाळे, विश्वनाथ गुंजाळ, गोरख गांगुर्डे, विजय आहेर, विलास शिंदे, नितीन शेवाळे, सोमनाथ शिंदे, खंडू जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम