सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | लासलगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षीय मुलांच्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तालुक्यातील भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या संघाने विजयश्री संपादित करून विभाग स्तरासाठी पात्रता मिळवली. लासलगाव येथे झालेल्या स्पर्धेत मुलांनी सलग चार सामन्यात विजय मिळवित अंतिम सामान्यात प्रवेश केला.
Deola | शिवसेना उ. बा. ठा. पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णींना आंदोलनाचा इशारा
आठ बळी राखून विजय संपादित
अंतिम सामन्यात मुलांनी ओझर इंटरनॅशनल स्कुलच्या संघावर आठ बळी राखून उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या सांघिक कामगिरीच्या सहाय्याने विजय संपादित केला. संपूर्ण टूर्नामेंट मध्ये उत्कृष्ट खेळ करीत सुमित बेडसे ,प्रसाद निकम, कृष्णा आवारे, योगेश निकम, शिव सावंत, सार्थक झाडे, स्वरूप डाके, कार्तिक पटेल, वेदांत देवरे, सत्यजित बोरसे, पृथ्वीराज सोनवणे, साई वराडे, दर्शन देवरे, शितिज पगार, कार्तिक निकम या विद्यार्थ्यांनी विजयात बहुमूल्य योगदान दिले. संपूर्ण संघाला खेळ शिक्षक मुदस्सर सैय्यद, धनंजय परदेशी, सुशांत बागुल, राजू देवरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या यशासाठी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, प्राचार्य सुनील पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बबलू देवरे, कैलास सागर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम