RTO Strike | राज्यातील आरटीओच्या संपानं कार्यालये ठप्प; वाहन विषयक कामे होत नसल्याने सर्वसामान्य त्रस्त

0
37
#image_title

RTO Strike | काल दिनांक 24 सप्टेंबर पासून राज्यातील आरटीओंनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाला सुरुवात केली असून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयाचे काम ठप्प झाले आहे. मागील दोन वर्षांपासून विविध प्रशासकीय तरतुदींमुळे सेवा विषयी गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे मोटार वाहन विभागात पूर्वीपासून 15 प्रादेशिक परिवहन कार्यालयानुसार नियतकालिक बदल्या केल्या जात होत्या. परंतु राज्य शासनाने हे धोरण बदलून महसूल विभागीय बदल्यांचे धोरण सुरू केले. हे धोरण कर्मचारी वर्गाच्या दृष्टिकोनातून अन्यायकारक असल्याची संघटनेची धारणा आहे. त्यामुळे गेली 66 वर्ष यशस्वीपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटनेन शासनाच्या या धोरणामुळे बेमुदत संप पुकारला आहे. परंतु या संपामुळे सर्वसामान्य वाहन चालकांसोबतच अवजड वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Good News | आता तुमच्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळणार घरबसल्या

संपामुळे सर्वसामान्यांची कामे रखडली

राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ट्रक चालक आणि मालक यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून वाहनासंबंधीची वाहन मालकी हस्तांतरण, फिटनेस प्रमाणपत्र, नूतनीकरण, पत्त्यात बदल करणे, एनओसी जारी करणे, हायपोथेकशनची कामे रखडली आहेत. तर राज्यातील संपूर्ण मालवाहतूक ही आरटीओ संपामुळे बाधित झाली असून या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास अवजड वाहतूक व्यवसायिकांची आणखी अडचण होणार असल्याचे वाहतूकदाराच्या कोर कमिटीचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकित सिंग यांनी सांगितले.

Nashik | दिवाळीत गावी जाणाऱ्यांची होतेय लूटमार; ज्यादा प्रवासभाडेबाबत करा तक्रार

बेमुदत संपामागे कारण काय?

मागील दोन वर्षात विविध अन्यायकारक प्रशासकीय तरतुदींमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. मोटार वाहन विभागात आधी 15 प्रादेशिक परिवहन कार्यालयाप्रमाणे एका ठराविक काळानंतर बदल्या होत्या. पण प्रशासनाने हे धोरण बदलून महसूल विभागीय बदल्यांचे धोरण सुरू केले. परंतु, “हे धोरण कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने अन्यायकारक असून लवकरात लवकर महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करावे.” अशी आरटीओ संघटनेची आग्रही मागणी आहे. तसेच विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रातही अनआकलीनीय बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील आरटीओ कर्मचारी हवालदिन झाला असून आकृतीबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे, कामकाजात सुसूत्रीकरण, योजनेसाठी नेमण्यात आलेल्या मा. कळसकर समितीच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी न करणे, विभागीय स्तरावरील आस्थापना विषयक, सेवा जेष्ठता आणि बदल्यांचे संयोजन याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबर पासून बे मुदत संप सुरू केला असल्याचे घोषित केले असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here