Deola | देवळ्यात बेकायदा गॅस रिफिलींगवर पोलीसांचा छापा; १३६ सिलेंडर, ०२ चारचाक्या व गॅस रिफिलिंगची सामुग्री जप्त

0
18
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यावसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार शुक्रवारी दि. २९ रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलींग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.

Deola | सहकार भारती जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा सचिव पदी दे.म.को.चे संचालक प्रमोद शेवाळकर

पोलिसांना अवैधरित्या गॅस रिफिलींग करत असल्याची टिप मिळाली

देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर पारिसरात काही संशयीत इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरकरीता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींग करत असल्याची बातमी स्थानिक पथकास मिळाली होती. त्यानुसार, पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी याठिकाणी छापा टाकला असता, संशयीत इसम नामे भागवत कारभारी जाधव, वय ४२, रा. सुभाषनगर, रामेश्वर फाटा, ता. देवळा हा शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ कलम २ (५) मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडरमधुन व्यापारी वापराकरीता वापरण्यात येणाऱ्या (निळया रंगाचे) गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसतांना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जिवीतास धोकादायक ठरेल.

अशा पध्दतीने गॅस रिफिलींग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आला असून त्याचे विरूध्द देवळा पोलीस ठण्यात गुरनं २५०/२०२४ भा.न्या.सं. कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये अवैद्यरित्या आढळून आलेले घरगूती वापराचे १०१ गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे ३५ गॅस सिलेंडर असे एकुण १३६ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे ०२ पिस्टन पंप व इलेक्ट्रीक मोटर, तसेच ०२ चारचाकी वाहने असा एकुण ११,१५,४००/- रू. किंमतीचा मुद्दे‌माल जप्त करण्यात आला आहे.

Deola | महात्मा फुले यांच्या १३४ व्या पुण्यतिथीनिमित्त माळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाकडून कारवाई

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव, अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here