Deola | सहकार भारती जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा सचिव पदी दे.म.को.चे संचालक प्रमोद शेवाळकर

0
21
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | सहकाराचा सर्वकष विचार होऊन पुढील किमान 25 वर्षांची परिस्थिती लक्षात घेत दिशा दर्शक कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बॅंक असोशिएशनचे अध्यक्ष व सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांनी केले.

Deola | महात्मा फुले यांच्या १३४ व्या पुण्यतिथीनिमित्त माळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सहकारातील सुसंस्कारामुळेच राज्याची व देशाची प्रगती होते – ओमप्रकाश कोयटे

सहकार भारती नाशिक वतीने सहकारातील आगामी दिशा या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून अजय ब्रम्हेचा बोलत होते. या प्रसंगी सहकारातील आगामी दिशा या व्याख्यानात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयटे म्हणालेत की, सहाकार हा तळागाळातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रूजला आहे. सहकारातील सुसंस्कारामुळेच राज्याची व देशाची प्रगती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Deola | दे. म. को. बँकेला रिझर्व्ह बँकेची लाभांश वाटपाची परवानगी – चेअरमन कोमल कोठावदे

55 प्रकोष्टकात सहकार भारतीचे कामकाज सुरू

सहकार भारतीचे प्रदेश संघटन प्रमुख शरद जाधव यांनी आपल्या मनोगतात सहकार भारती राज्यभरासह देशभरात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 55 प्रकोष्टकात सहकार भारतीचे कामकाज सुरू असल्याची माहिती दिली. सहकार भारती नाशिक विभाग प्रमुख बन्सीलाल अंबोरे यांनी नाशिक जिल्हा कार्यकारणीची घोषणा केली. सहकार भारती नाशिक जिल्हा प्रमुख नारायण वाजे (सिन्नर), महामंत्री शंतनू पाटील (लासलगांव), उपाध्यक्षपदी काका व्यवहारे (चांदवड), सचिवपदी प्रमोद शेवाळकर (देवळा), संघटन प्रमुख राजेंद्र जुन्नरे (कळवण) तर सह संघटन प्रमुख महेश कदम (नाशिक) व रत्नाकर बकरी (ईगतपुरी) यांची नियुक्ती करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here