Maharashtra Political | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 7 दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी राज्यामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे. तर महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता होणार असून यावेळी शपथविधी सोहळ्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Maharashtra Politics | ‘या’ तारखेला होणार नव्या सरकारचा शपथविधी; बावनकुळेंकडून आमदारांना विशेष सुचना
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 235 जागा मिळवत युतीने आपली सत्ता राखली तर भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवरती विजय मिळवला आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची 3 तारखेला दुपारी 1 वाजता बैठक होणार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी सोहळ्याची वेळ व तारीख जाहीर केली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असेल किंवा मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत संभ्रम कायम आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची 3 तारखेला दुपारी 1 वाजता बैठक होणार असून या बैठकीत दिल्लीतून निरीक्षक येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये विधिमंडळातील नेत्यांची निवड केली जाणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पदाकरिता देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे.
गृहमंत्री पद भाजपकडे राहणार?
तसेच सूत्रांच्या माहितीप्रमाणे, 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपचे 25 कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे 9 कॅबिनेट मंत्री व 3 राज्यमंत्री. तसेच राष्ट्रवादीचे 6 कॅबिनेट मंत्री व 2 राज्यमंत्री यांचा शपथविधी होणार असून यामध्ये गृहमंत्री पद हे भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम