Eknath Shinde | एकनाथ शिंदे तडकाफडकी आपल्या गावी म्हणजेच साताऱ्याला गेले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद करणं टाळत थेट घर गाठलं. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. परंतु ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी दिली. आता एकनाथ शिंदे उद्या रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मुंबईला परतणार असून सत्ता स्थापनेचा पेच सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Eknath Shinde | बैठका सोडून शिंदे तडकाफडकी गावी; युतीच्या बैठका रद्द..?
“माध्यमातील चर्चांवर लक्ष देत नाही” – देवेंद्र फडणवीस
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप व घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना सलाईन लावण्यात आल्याची माहिती त्यांच्या फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली असून चार जणांचे डॉक्टरांचे पथक उपचार करत असल्याची माहिती आहे. ते उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे अचानकपणे गावी गेल्यामुळे माध्यमांमध्ये त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी “माध्यमातील चर्चांवर आम्ही लक्ष देत नाही.” असे उत्तर दिले होते. तर एकनाथ शिंदे त्यांच्या गावी का गेले? याबाबत आता शंभूराजे देसाई यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
एकनाथ शिंदे यांना त्रास होत असल्यामुळे आम्ही त्यांना आराम करण्यासाठी आग्रह केला होता आणि म्हणून ते गावी गेले आहेत. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार असून ते कुठल्याही गोंधळात नाहीत. जे त्यांच्या पोटात आहे तेच त्यांच्या ओठावर येते. एकनाथ शिंदे महायुती सोबत आहेत व महायुती जो निर्णय घेईल त्यांच्यासोबतच ते राहतील.” असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी ही दिले स्पष्टीकरण
तसेच, अजित पवार यांनी देखील एकनाथ शिंदे गावी का गेले याचा खुलासा करत, “विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वजण प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे. काळजीवाहू सरकार असल्यामुळे जास्त काम नाही. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टी साधून एकनाथ शिंदे गावी गेले आहेत.” असे सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम