Dada Bhuse | नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे हे यंदा पाचव्यांदा मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गाव भेट प्रचार दौऱ्याच्या मध्यमातून भुसे यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून, त्यांच्या या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी त्यांचे जोरदार स्वागत होत असून, पुन्हा एकदा दादा भूसेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार जनतेकडून व्यक्त केला जात आहे.
यातच आता दादा भुसे यांच्या पत्नी अनितामाई भुसे याही मैदानात उतरल्या असून, महिला आघाडीसोबत त्यांनीही मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या रॅली, सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. यातून मालेगावच्या लाडक्या बहिणी या दादा भाऊंच्या पाठीशी असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. गावोगावी घरोघरी जाऊन त्या महिलांना महायुती सरकारच्या महिलांसाठीच्या योजना, मालेगावमधील विकासकामांची माहिती देत आहेत.
Dada Bhuse | जनता यांचे रडीचे डाव जाणते, ते यांना भीक घालणार नाही; भुसेंचे विरोधकांवर शरसंधान
साहेबांनी आमच्या डोक्यावरचे हंडे उतरवले…
प्रत्येक गावात महिलांचा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. साहेबांनी मतदार संघात केलेल्या कामांविषयी महिला समाधान व्यक्त करीत आहेत. उन्हाळ्यात आम्हाला दुरदूरहून पिण्यासाठी पाणी आणावे लागत. मात्र, साहेबांनी गावोगावी बंधारे बांधून जुन्या बंधाऱ्यांची दुरस्ती करून पाण्याचा प्रश्न सोडवला. त्यामुळे यंदा आम्ही उन्हाळ्यातही पीकं घेतली. साहेबांनी आमच्या डोक्यावरचे हंडे उतरवले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, अशी भावना महिला आपल्याजवळ बोलून दाखवत असल्याचे अनिता भुसे यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ माता भेटतात, औक्षण करतात. डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद देतात. साहेबांचे कौतुक करतात. त्यावेळी गहिवरून येते. हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याची भावनाही अनिता भुसे यांनी व्यक्त केली.
Dada Bhuse | ‘काही लोकांनी गरिबांच्या नावावर 100 कोटींचे व्यवहार केले’; दादा भूसेंचे मोठे गौप्यस्फोट
राज्यातील पहिले महिलांसाठीचे मॉड्युलर हॉस्पिटल मालेगावात उभारले
राज्यातील पहिले महिलांसाठीचे मॉड्युलर हॉस्पिटल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय हे मालेगावात उभारण्यात आले आहे. यामुळे मालेगावातील महिलांना मोफत उपचार मिळत आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या प्रसूती याठिकाणी मोफत झाल्या आहेत. या रुग्णालयाचा मालेगावमधील सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असून, या महिला भुसे यांचे आभार मानत आहेत. भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महिलांचे लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरून घेतले. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे. महायुती सरकारच्या महिलांसाठीच्या योजना आणि भुसे यांचे मतदारसंघातील विकासकामं यामुळे लाडक्या बहिणी दादा भुसेंना भरभरुन आशीर्वाद देतील आणि लीडने निवडून आणतील असे चित्र मतदारसंघात दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम