Nana Patole | विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून एकीकडे राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचार सभांचा धुरळा उडाला असून दुसरीकडे नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहेत. त्याचबरोबर नेत्यांकडून वेगवेगळी आश्वासन व दावे ही करण्यात येत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून, “भाजपाला आता पराभव दिसू लागला असल्यामुळे भाजपचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्या बद्दल बोलत नसून “बटेंगे तो कटेंग”, “एक हे तो सेफ है” च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करू पाहत आहेत. याला बळी पडू नका. जाती धर्मात फूट पाडणाऱ्या भाजप युतीला सत्तेतून तडीपार करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर दिल्लीतील नरेंद्र मोदींची सत्ता देखील जाईल.” असा मोठा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
Nana Patole | ‘महाराष्ट्र आज विनाशाच्या उंबरठ्यावर’; नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात
शेतकरी तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही
प्रचार सभेत बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर तोफ डागली असून, “नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात यवतमाळमध्ये “चाय पे चर्चा” कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देवू तसेच सत्तेत आल्यावर शेतकरी कर्जमाफीवर पहिली सही करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यावर ‘ते चुनावी जुमले होते.’ असे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक केली. आता देवेंद्र फडणवीस देखील शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देत आहेत. सत्तेत आलो तर शेतीमालाला हमीभाव देण्याची भाषा करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार असून मागील 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. त्यामुळे बळीराजाला खोटी आश्वासन देऊन फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपच्या या भूलथापांना बळी पडणार नाही.” असे म्हटले आहे.
Nana Patole | ‘मी अनेक खुर्च्या…’; मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोलेंनी केल्या भावना व्यक्त
मनुवादी प्रवृत्तींना घरी बसवण्याची वेळ आली आहे
तसेच, “विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला भाजप युती सरकारने संकटात टाकले असून शिंदे, फडणवीस व अजित पवारांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शहांना महाराष्ट्र लुटू देण्याचे पाप केले आहे. महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजप युती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यावरी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. त्यामुळे अशा मनुवादी प्रवृत्तींना घरी बसवण्याची वेळ आली आहे.” असे देखील त्यांनी म्हटले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम