Dada Bhuse | जनता यांचे रडीचे डाव जाणते, ते यांना भीक घालणार नाही; भुसेंचे विरोधकांवर शरसंधान

0
67
#image_title

Dada Bhuse | महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दादा भुसे यांच्या गाव भेट प्रचार दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावांमध्ये झालेल्या विकासकामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दादा भुसे यांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून यंदाच्या निवडणुकीत पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने भुसे यांना निवडून देण्याचा विजयी निर्धार जनता व्यक्त करत आहे.

आज भुसे यांचा वडनेर गण येथे प्रचार दौरा पार पडला. यावेळी त्यांनी वडनेर गणातील वळवाडे, गारेगांव, पोहाणे, कजवाडे, रामपुरा, चिंचवे, लुल्ले, विराणे, वळवाडी, खाकुर्डी, वडनेर, सावतावाडी या गावांना भेट देत विकासकामांची माहिती दिली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महायुती शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Dada Bhuse | ‘काही लोकांनी गरिबांच्या नावावर 100 कोटींचे व्यवहार केले’; दादा भूसेंचे मोठे गौप्यस्फोट

भूल थापांना बळी पडणार नाही

भुसे साहेबांनी एक ना अनेक कामं आमच्या गावांमध्ये केली आणि खऱ्या अर्थाने गावं सुजलाम सुफलाम झाली. विरोधक म्हणतायत, आणीबाणी पण साहेब हे राजकारणातील शांत, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या, टीका केल्या. तरीही आम्ही त्यांच्या भुल थापांना बळी पडणार नाही आणि पुन्हा दादा भुसे यांचा विजयी गुलाल उधळण्यासाठी जोमाने काम करू, असा निर्धार जनतेने व्यक्त केला.

‘तुम्ही माझं कुटुंब आहात..’

यावेळी बोलताना भुसे म्हणाले, “जनतेचा माझ्यावरील विश्वास आणि प्रेम हेच माझ्या आजपर्यंतच्या कामाची पोचपावती आहे. कोणी काहीही बोललं तरी मायबाप जनता सर्व जाणते. तुम्ही माझं कुटुंब आहात आणि माझ्या कुटुंबीयांची मान कायम अभिमानाने उंचावत राहील. माझ्या मालेगावात कशाचीही कमी पडणार नाही. हे माझे कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील,” असे यावेळी भुसे यांनी आश्वासित केले.

Dada Bhuse | मालेगावच्या सभेत दादा भुसे कडाडले; ‘येडं पायडू’ म्हणत हिरेंना ललकारले

ते सरळ मार्गाने माझं काही बिघडवू शकत नाहीत

“मी २० वर्षात काय केलं आणि कोणाला काय दिलं. हे जनतेला माहितीय. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत उतरलो आहोत. मात्र, समोरच्या उमेदवारांकडे प्रचाराला काही नाही. त्यामुळे माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करून, अफवा पसरवून ते बदनामी करू पाहताय. पण याचं मला वाईट वाटत नाही. कारण ते सरळ मार्गाने माझं काही बिघडवू शकत नाहीयेत म्हणूनच त्यांनी बदनामी सुरू केलीय. पण जनतेला यांचे हे रडीचे डाव माहितीय. त्यामुळे ते यांना भीक घालणार नाही. २० तारखेला मतदार योग्य निर्णय घेऊन विकासाचे म्हणजेच धनुष्य बाणाचे बटन दाबून आम्हाला भरभरुन आशीर्वाद देतील.” असा विश्वास यावेळी भुसे यांनी व्यक्त केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here