Congress Political | काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर; खुर्ची वरून रंगले नाराजी नाट्य

0
44
#image_title

Congress Political | सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून प्रचार सभांनी राज्यभर धुरळा उडवला आहे. अशातच रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हस्ते मुंबईत ‘महाराष्ट्रनामा’ नावाने जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नाशिक येथील हॉटेलमध्ये दाखवण्यात आले. मात्र यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले. व्यासपीठावर दोनच खुर्च्या असल्यामुळे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी नाराजी व्यक्त करत थेट शेवटची रांग गाठली.

Congress Political | इगतपुरी मतदारसंघात तुलनेने कमकुवत उमेदवार दिल्याने नाराजी नाट्य; काँग्रेसच्या 65 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नेमके काय घडले?

शहर काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे पक्षसंघटन होत नसल्याची निष्ठावान कार्यकर्त्यांची तक्रार असते. रविवारी महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्रनामा’ जाहीरनाम्याचे प्रक्षेपण झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता शुभ्रांशू राय व शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड हे व्यासपिठावर विराजमान होते. यावेळी पदाधिकारी दिवे आले असता शहराध्यक्ष छाजेड यांनी त्यांना बसण्याची विनंती केली. त्यावर दिवे यांनी, “तुम्ही स्टेजवर फक्त दोनच खुर्च्या ठेवल्या आहेत. तेव्हा आम्ही मागे जाऊन बसतो. तुमचं चालू द्या. असे म्हणत नाराज होत मागची रांग गाठली. तसेच प्रदेश कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या चहापाण्याकडे पाठ फिरवल्याचेही पहायला मिळाले.

Congress Political | इगतपुरी मतदारसंघात तुलनेने कमकुवत उमेदवार दिल्याने नाराजी नाट्य; काँग्रेसच्या 65 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

शुभ्रांशु रॉय यांनी जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे मांडले

हे संपूर्ण नाराजी नाट्य पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राय यांच्यासमोर घडले. त्यानंतर त्यांनी जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे मांडून तिथून रजा घेणे पसंत केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र बागुल, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, सिराज कोकणे, जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, वसंत ठाकूर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here