Igatpuri Political | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरूच आहे. इगतपुरी मतदारसंघातील माजी व अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाकडून स्थानिक नेत्यांच्या शिफारशी विरुद्ध लकी जाधव या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊ केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हिरामण खोसकर व अपक्ष माजी आमदार निर्मला गावित यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
Igatpuri | आता शिधापत्रिका काढण्यासाठी व दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयाच्या चकरा बंद
मविआचा गावितांना पाठिंबा
काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेसच्या 65 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असे महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी अपक्ष उमेदवार माजी आमदार गावित यांना पाठिंबा दर्शवित आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार गावित यांच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे.
अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांनी अजित पवार पक्षाचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्यावर गंभीर आरोप केले असून, “आमदार खोसकर यांनी मतदारसंघात विकास केला नाही तर निधी आणून टक्केवारीचे गैरप्रकार केले. ज्यामुळे जनतेचा व गावाचा विकास झाला नाही. ठराविक लोकांचा विकास आमदार खोसकर यांनी केला” असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. आमदार खोसकारांनी क्रॉस वोटिंग केले, मोठा गैरप्रकार केला. ज्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. या क्रॉस वोटिंगमुळे इगतपुरी मतदारसंघाच्या नावाची भारतभर बदनामी झाली. खोसकर या बदनामीचे कारण आहेत. गुन्हा करून देखील ते पुन्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करत आहेत. याला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हटले जाते.” असं म्हणत टीका केली.
Igatpuri | घोटी पोलीसांची धडक कारवाई देवाची वाडी येथील गावठी दारू भट्टी उध्वस्त
इगतपुरी मतदारसंघाची बदनामी खोसकरांमुळे झाली!
इगतपुरी मतदारसंघात सध्या माजी आमदार गावित यांच्या प्रचाराकरिता ठिकठिकाणी सभा होत असून यावेळी त्यांनी मतदारांसोबत थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. “मी गेली दहा वर्षे आमदार होते. चार वेळा राज्यसभा व विधान परिषदेसाठी मतदान केले. मात्र पक्षाच्या आदेशानुसार वर्तवणूक केली. मी देखील क्रॉस वोटिंग करू शकले असते. मात्र आमच्यावर चांगले संस्कार आहेत. मी असे काही केले नाही. केले असते तर मतदार संघातील मतदारांनी मला, “ताई तुम्हाला कशासाठी निवडून दिले होते? असा प्रश्न विचारला नसता. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. कारण माझी बांधिलकी फक्त माझ्या मतदारसंघातील मतदारांशी आणि पक्षाशी होती. पण आमदार खोसकर रोज नव्या नेत्याच्या अगदी विरोधकांच्या घरी त्यांचे पाय धरायला जातात. अशी वर्तवणूक मतदारांना अपेक्षित असते का? हे कुठले राजकारण आहे?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम