Dada Bhuse | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यात सध्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. पालकमंत्री दादा भुसे आज मालेगाव बाह्य मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार होते. त्याकरिता मालेगावात भव्य रॅली काढण्यात आली असून त्यानंतर एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दादा भुसे मागील 20 वर्ष मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून आगामी निवडणुकीत त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे आणि अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचे आव्हान असणार आहे. तर दोन दिवसांपूर्वी अद्वय हिरेंकडून दादा भुसेंवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर दादा भुसे यांनी 28 तारखेच्या सभेत बोलणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले होते.
Dada Bhuse | दादा भूसेंना आशीर्वाद देण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर
काय म्हणाले दादा भुसे?
यावेळी बोलताना दादा भुसे यांनी “गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांचे जे सुख-दुःखाचे कारण आहे. त्यामुळे आपण एकत्रित आलो आहोत. पंधरा दिवसांपूर्वी अनेक गावांमध्ये पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यात आम्ही सोबत राहू. सर्वांच्या पहिले धावून जातो तो म्हणजे आमचा कार्यकर्ता. विकास कामे घेऊन आम्ही जनतेच्या दारात जाणार आहोत. कृषी पंढरीचे पवित्र काम मालेगावात झाले आहे. मालेगावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाईल. या मालेगावच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारने कोट्यावधींचा निधी दिला आहे. तसेच देशपातळीवर शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिले जाणारे हे पहिले राज्य आहे.” असे म्हणत आतापर्यंत झालेल्या विकास कामांविषयी भाष्य केले.
दादा भुसे यांचा अद्वय हिरेंवर हल्लाबोल
तसेच, “आतापर्यंत सर्व समाजाच्या लोकांनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. तरी काही हुशार लोकांना असे वाटते की त्यांनाच नारपार कळते…नारपारमुळे शेती उद्योगासह सर्व क्षेत्रासाठी ते पाणी उपयोगी येणार आहे. त्यामुळे शरीर मोठेपण बुद्धी छोटी” असं म्हणत अद्वय हिरे यांना टोला लगावला. तसेच “काही लोक आति बळजबरीने फोटो काढायला लागले आहेत. विरोधक म्हशीच्या तब्येतीच्या पाहणीसाठी जायला लागले आहेत.” असे म्हणत बंडूकाका यांनाही टोला लगावला.
पुढे बोलत, “मी कुणाला काय दिले ते जनतेच्या दरबारात बसून चर्चा करा तेव्हाच तुम्हाला कळेल. आता काहींनी पातळी सोडली आहे. ही गर्दी पाहून काहींना रात्रीची झोप लागणार नाही. मोठे मोठे गँगस्टार्स मालेगावात आले आहेत…..मालेगावच्या एकालाही धक्का लावला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. असे म्हणत थेट इशारा दिला असून “जे कोणाला सांगितले नाही, ते सर्वांच्या समोर सांगतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 4 वेळेस निवडून मंत्री बनवले त्या जनतेचे आभार” असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली.
हिरे कुटुंबीयांवरही साधला निशाणा
त्याचबरोबर, अद्वय हिरे यांना ‘येडं पायडू’ असे संबोधत, “त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचे पाय पडत होते. आम्ही मालेगाव सोडून देऊ असे सांगत होते. बाप काढणाऱ्यांना मी सांगतो, जे महात्मा गांधी विद्यामंदिरच्या नावाने निवडणुकीवेळी नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवतात की, या संस्था तालुक्यातील जनतेच्या पैसा वापरून उभ्या केल्या आहेत. या संस्थांवर एक कुटुंब नागोबा म्हणून बसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी देखील सांभाळून राहावे. चार महिन्यात यांचा कार्य कार्यक्रम करू. संस्थेच्या संचालक परिपुष्पाताई असल्याने मी थांबलो असून “पुष्पाताई थोडेसे बाजूला व्हा मग मी संस्थेवर प्रशासक आणल्याशिवाय राहणार नाही” असे म्हणत हिरे कुटुंबीयांवरही निशाणा साधला.
Dada Bhuse | ‘बापाची औलाद असशील तर दाखव पेनड्राईव्ह’; भूसेंचे विरोधकांना खुले आव्हान
विरोधकांना थेट आव्हान
तसेच “मी देखील आता स्वतःमध्ये बदल करणार असून येणाऱ्या काळात कामकाज करताना समन्वय समिती निर्णय घेईल व तेच काम करणार आहेत. पुढच्या काळात जो महायुतीच्या कामाचा नाही तो आपल्याही कामाचा नाही. गेल्या चार टर्म आमदार आणि मंत्रीपद तुमच्या मुळे मिळाले आहे. माझा योजना बंद करणाऱ्यांना चॅलेंज आहे. योजना बंद करूनच दाखवा.” असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम