Raj Thackeray | ‘उद्या महायुतीला गरज लागू शकते…’; राज ठाकरेंच्या वक्तव्याने वेधले लक्ष!

0
37
#image_title

Raj Thackeray | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू प्रचार सभांनी महाराष्ट्र दणाणून सोडला असून या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राज ठाकरे राज्यभर दौरा करून मनसे उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. अशातच त्यांच्याकडून आता महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वाचा फोडली आहे.

Raj Thackeray | ‘शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांची प्रॉपर्टी’; उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंना लक्ष करत राज ठाकरेंनी साधला निशाणा

काय म्हणाले राज ठाकरे? 

“मनसेच्या मदतीने युती सरकार येउ शकते, महायुतीला उद्या गरज लागू शकते. माझे जास्तीत-जास्त आमदार निवडून आणायचा प्रयत्न आहेत. 23 तारखेनंतर काय होईल हा नंतरचा विषय आहे. असे म्हटले. तसेच, “एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत. हे फडणवीसांचे मत आहे. त्यांचे मत त्यांच्याकडे. कोणी काय मत मांडायचे हे त्यांनी ठरवावे. मी कसे ठरवणार? त्यांना त्यांच्यात वारसा दिसत असेल तर दिसू द्या. कोण काय बोलतेय याची उत्तरं मी का द्यायची?” असे राज ठाकरेंनी सांगितले

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काही केले नाही. असे म्हटले होते. यावर भाष्य करत त्यांनी, “त्यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील. ज्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याची एक पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट झाली नाही, मी जातपात पाहिली नाही. जातीचे राजकारण केले नाही. शरद पवारांचे राजकारण महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या-मोठ्या संघटना उभ्या करायच्या, त्यांना पैसे पुरवायचे. या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. काही गोष्टी मला बोलायच्या नाहीत.” असे म्हणत शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Raj Thackeray | राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर

बंद खोलीतील चर्चेबाबतही केला खुलासा

“2019 मध्ये बंद खोलीत काय झाले होते. त्याबाबत भाजप बोलण्याआधी त्या चर्चेबाबत तीन-चार वर्षांपूर्वी झालेल्या सभेत मी बोललो होतो. नरेंद्र मोदी यांच्या सभेचा उल्लेख करत सर्व सांगितले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी फडणवीस मुख्यमंत्री असतील असे म्हटले होते. अमित शहा देखील हेच म्हणाले. उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले असते तर त्यांनी आक्षेप का घेतला नाही? तुमचे म्हणणे अडीच वर्षाचे ठरले होते, तर मग आक्षेप का घेतला नाही? त्यामुळे त्यांच्या तर्काला काही अर्थ नाही. आपल्या शिवाय सरकार बघू शकत नाही हे जेव्हा लक्षात आले, तेव्हापासून त्यांनी बोलायला सुरुवात केली. 1995 मध्ये मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा भाजपने दावा केला नाही, मग तुम्ही कसा केला? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी विचारला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here