chhagan bhujbal | भुजबळांची कोंडी..?; भुजबळ बंधूंना बजावली नोटिस

0
12
chhagan bhujbal
chhagan bhujbal

chhagan bhujbal |  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत आहेत. कधी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेच्या विरोधातील वक्तव्ये तर, कधी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप. दरम्यान, आता छगन भुजबळ यांच्यासह आता भुजबळ कुटुंबीयांच्याही अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. तोट्यात असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच नामको बँकेने आता थकीत असलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.(chhagan bhujbal)

दरम्यान, त्याअंतर्गत दाभाडी येथील भुजबळ कुटुंबीय, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या मालकीच्या ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ (गिसाका) या साखर कारखान्यावरील ५१ कोटी ६६ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी या कारखाना स्थळावर जाऊन कर्ज मागणी नोटीस लावली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या भुजबळ बंधूना बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.(chhagan bhujbal)

Chhagan Bhujbal | मोदींचा नाशिक दौरा; भुजबळ मात्र नियोजनातही नाही!

chhagan bhujbal | नेमकं प्रकरण काय..?

दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना हा भुजबळ कुटुंबीयांनी खरेदी केलेला आहे. याच आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (गिसाका) या साखर कारखान्यासाठी भुजबळ कुटुंबीयांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँके(नामको) कडे (दि. १० नोव्हेंबर २०११) मध्ये तब्बल ३० कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. दरम्यान, नामको बँकेने (दि. ३ जानेवारी २०१२) रोजी मागणी केलेल्या ३० कोटी रककमेच्या कर्जाला मंजूरी दिली. एकूण रककमेपैकी या कारखान्याने ३० कोटींपैकी १८ कोटींचे कर्ज फेडलेले आहे.(chhagan bhujbal)

Chhagan Bhujbal | ‘त्यांच्या’ पत्नीने माझ्याकडे हात जोडले; भुजबळांची जहरी टिका

मात्र, सन २०१३ पासून या कारखान्याकडे तब्बल १२ कोटी १२ लाख इतकी थकीत मुद्दल आणि ३९ कोटी ५४ लाख इतके व्याज असे एकूण ५१ कोटी ६६ लाख रुपये हे थकीत आहेत. दरम्यान, आता नामको बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असल्याने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता वासुलीसाठीची कडक माहीम हाती घेतली असून, त्यानुसार समीर आणि पंकज भुजबळ यांच्या गिरणा सहकारी साखर कारखान्याला सरफेशी कायद्यांतर्गत कारखाना स्थळावर जाऊन ही मागणीची नोटीस बाजावली आहे.

तसेच या कारखान्याचे संचालक पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह सत्येन केसरकर यांनाही यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे. तीन वर्षांपासून बँक तोट्यात असल्यामुळे बँकेकडून ही कर्ज थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(chhagan bhujbal)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here