Chhagan Bhujbal | ‘त्यांच्या’ पत्नीने माझ्याकडे हात जोडले; भुजबळांची जहरी टिका

0
4
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे आण व नागरी पुंरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या आणि मनोज जरांगे यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, आता भुजबळ यांनी जहरी टीका केली आहे. मात्र, यावेळी ती जरांगेंवर नाही तर, त्यांचेच एका वेळचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कली आहे. (Chhagan Bhujbal)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिर्डी येथील मेळाव्यात घणाघाती टीका केली होती. तर, जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “जितेंद्र आव्हाडांसाठी मला फार वाईट वाटतं, ते ओबीसी समाजाचे असूनही आतापर्यंत ते कधीही ओबीसी आरक्षणाबाबत एक शब्दही बोलले नाहीत. एक शब्द देखील बोलण्याची या आव्हाडांची हिंमत झाली नाही,’ अशी टीका छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.(Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | येवल्यातून भुजबळांच्या विरोधात ‘हा’ नेता मैदानात उतरणार

त्यांच्या पत्नी माझ्याकडे येऊन हात जोडत होत्या

यानंतर पुढे भुजबळ म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांना मंत्री करण्यासाठी त्यांच्या पत्नी ह्या माझ्याकडे येऊन हात जोडत होत्या. त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून मी शरद पवार यांना सांगितलं होतं, हे आव्हाड फार लवकर विसरले. माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी अजून तुम्ही फार लहान आहात. तुम्ही तुमचं काम करा, इतकं उतावीळ होऊ नका,’ अशा खोचक शब्दांत यावेळी भुजबळांनी टिका केली आहे. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | भुजबळांविषयी काय म्हणाले आव्हाड?

‘ओबीसी समाजाचे आरक्षण हे संविधानिक आहे आणि ते कुणीही कापू शकत नाही. मग भुजबळ यांना एवढं बोलायला कुणी लावलंय? राज्यातील गावं पेटली पाहिजेत अशी तुमची इच्छा आहे का? शरद पवाररांनी राज्यातील सर्व गावं एकत्र आणण्याचं काम केलं आहे. मग, भुजबळांना ती सामाजिक परिस्थिती उद्धवस्त करायची होती का?’ असा सवाल शिर्डी येथील सभेत आव्हाडांनी केला होता.(Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?

यानंतर ते म्हणाले की, “आम्ही भुजबळ यांना आजही ओबीसी समाजाचे नेतेच मानतो. पण आता तुमचा तोल का गेलाय, हेच कळत नाही. तुम्हीही या त्रिकुट सरकारच्या राजकारणाचे बळी ठरत आहात का?. तुम्ही तर, ओबीसींच्या मनात मराठ्यांच्या विरोधात पाप निर्माण केलं आहे. राज्यातील ओबीसींना पुढे करून तुम्हाला महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र करायचं आहे का? तुम्हाला महाराष्ट्रात रक्ताचा सडा पाडायचा आहे का? तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात. कॅबिनेटमध्ये असताना तुम्ही असं बोलू शकत नाही? जे कॅबिनेटमध्ये बोलायचं होतं. ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलताय. तलवार काढू वगैरे ही भाषा राज्यच्या एका कॅबिनेट मंत्र्याला शोभणारी नाही,” अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाडांनी केली होती.(Chhagan Bhujbal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here