Skip to content

देवळा बस अपघातात 2 गंभीर जखमी; नाशिक येथे हलवले


नाशिक: कळवण देवळा रस्त्यावर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना नाशिक सरकारी हॉस्पिलटमध्ये हलविण्यात आले आहे. तर 4 जखमी प्रवाशांवर देवळा येथे सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अपघाताचा प्रकार -गंभीर असून यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज रोजी सुमारे 7.25 वा. च्या दरम्यान हा अपघात झाला असून कळवण आगरची ही बस होती.  एमएच 07सी 9108

ही बस कळवण हून मालेगावच्या दिशेने जात होती. बस मधील प्रवाशी संख्या 18 रा प जखमी- 16+2 ( चालक,वाहक) अशा स्वरूपाची होती.

आज रोजी रात्री 7.25 वाजेच्या सुमारास रा. प.कळवण आगाराची बस .. क्र.MH07 सी 9108  कळवण मालेगाव मार्गावर धावत असताना नर्मदा मोती कॉम्प्लेक्स समोर कळवण देवळा रोड या ठिकाणी बस आली. या ठिकाणी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने, चालक बाजूस बस पोल ला धडकून नंतर वाहक बाजूस चिंचेच्या झाडावर जावून बस धडकली यात वाहक बाजू पूर्णतः दाबली गेली आहे. यात वाहकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असून चालक सीट मध्ये अडकले तसेच 2 प्रवाशी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच इतर 14 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे .

जखमी खालील प्रमाणे

1)उषाबाई पोपट थोरात डोक्याला

2) ओमकार बाबासाहेब शिरोळे

3) हर्षवर्धन युवराज पगार

4) भिका रूपसिंग सोळंके

5) राहुल राजू कचवे

 6) योगेश महाले (वाहक )

7) अकबर अली शहा

8) अरविंद जोंधळे

9) पांडुरंग शंकर साठे

10) पुरुषोत्तम देवभा ठाकरे (चालक )

11) कोमल विकास शिरसाट

12) मोहम्मद मनू ..

13) सरिता भाऊराव सूर्यवंशी

 14) मेहदीन अब्दुल गफर

15) आकाश कृष्णा गांगुर्डे

 16) लखन हरी सोनवणे

17) योगिता लखन सोनवणे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!