Skip to content

26 November |  संविधानाचा स्वीकार ते मुंबईवर हल्ला; आजच्या दिवशी काय घडलं..?


26 November |  आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय काय घडलं होतं? हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्यावाईट घटनांच्या तारखांची इतिहासात नोंद असते. आज म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी भारतात तसेच जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या.

आजच्याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबई नगरीवर हल्ला केला होता. यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. आजच्याच दिवशी भारतानं संविधान स्वीकारलं. त्यामुळे आपण आजचा दिवस हा “संविधान दिन” म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

1949| संविधान दिन

आपल्या देशात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार करुन आज ७१ वर्ष पूर्ण झालीत. इतर देशांच्या संविधानांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता.

त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला होता. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात २६ नोव्हेंबरला संविधान दिन हा साजरा केला जातो.

Deola | खर्डे येथील किरण खैरनार यांना ‘उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्कार’

1960| STD सेवा सुरु

आज आपल्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजीची संपर्काची साधने आहेत. मोबाईलमुळे आपण जगात कुठेही असलेल्या व्यक्तीशी संपर्क करू शकतो. पण, काही दशकांपूर्वी फोनची सुविधा ही श्रीमंतांसाठीच होती. पण, १९६० मध्ये STD च्या माध्यमातून ही सुविधा सामान्यांनासाठी उपलब्ध झाली.

2008| २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण झालीत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या तब्बल दहा दहशतवाद्यांनी मायानगरी हादरवून टाकली होती. ह्या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं.

आजही दहा वर्षानंतर या भीषण हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन दलाच्या जवानांनी आपले प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर, शहीद तुकाराम ओंबळे यांनी स्वत:च्या प्राणांची आहुति देत, अजमल आमीर कसाब ह्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं.

Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

तर, कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं होतं. २६/११ चा हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता.२६ नोव्हेंबर २००८ रोजी शस्त्रांसह दहा पाकिस्तानी दहशतवादी कराची येथून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले.

ह्या अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल व नरिमन हाऊस या ठिकाणांवर हल्ला केला होता. ह्या दहशतवाद्यांनी सुमारे ६० तास धुमाकूळ घातला होता. या हल्लात १६६ पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. तर, ३०० पेक्षा जास्त लोक हे जखमी होते. ह्या हल्ल्यातील मृतांमध्ये २८ परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

Nashik News | ग्रामसचिवालयांसाठी जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!