Skip to content

Nashik News | ग्रामसचिवालयांसाठी जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच


Nashik News |  देशाच्या अमृत महोत्सावानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी दोन ग्रामसचिवालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयातील १५ तालुक्यांमधून आठ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

यात जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील सौंदाणे, तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातील नगरसूलचाही प्रस्ताव आहे.

त्यामुळे ग्रामसचिवालय हे आपल्या तालुक्यात आणण्यासाठी आता आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याची दिसत आहे.

देशाच्या अमृतमहोत्सव निमित्त लोकोपयोगी उपक्रमांच्या अंतर्गत राज्यातील ७५ गावांत सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण ७५ ग्रामसचिवालये उभारण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतला होता. दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठी दोन ग्रामसचिवालये मंजूर झाली आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती-मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेंतर्गत १८ लाख व राज्य शासनाकडून ३२ लाख अशी एकूण प्रत्येकी ५० लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

OBC sabha | ओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

यातून ग्रामसचिवालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात वेगवान इंटरनेट सुविधा, आपले सरकार सेवा केंद्र, बँक, एटीएम आणि पूर्णपणे सोलर ऊर्जेचा वापरही त्यात अंतर्भूत असणार आहे. ग्रामसचिवालय निवडीचे जास्त लोकसंख्या असूनही ज्या ग्रामपंचायतीचे कार्यालय हे सुस्थितीत नाही, अशाच ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.

त्याचे नियंत्रण, मालकी ग्रामपंचायतीचीच राहणार असून, देखभाल, दुरुस्तीचीही जबाबदारी भविष्यात त्यांचीच असणार आहे, असे निकषही आहेत. त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आठ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. नियमाची पूर्तता होणाऱ्या गावात आता ह्या ग्रामसचिवालयाची उभारणी होणार आहे. पण, अद्याप त्यासाठीची गावांची नावे निश्चित झालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘नमो ग्रामसचिवालय’ उभारणीचे आलेले प्रस्ताव हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केले जातील. या निकषानुसार गावांची निवड होणार आहे. त्यामुळे यात कोणत्या तालुक्यात ग्रामसचिवालये जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्राप्त प्रस्ताव

सौंदाणे (ता. मालेगाव), नगरसूल (ता. येवला), गिरणारे (ता. नाशिक), तसेच ताहराबाद (ता. सटाणा ), पिंपळगाव बसवंत (ता. निफाड), अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर), गोंदे (ता. इगतपुरी), मनेगाव (ता. सिन्नर) हे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

चांदवडमध्ये राहत्या घरात पती-पत्नीची आत्महत्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!