Skip to content

OBC sabha | ओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न


OBC sabha | आज हिंगोली येथील दुसऱ्या ओबीसी मेळाव्याआधीच नांदेडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला आहे. या आंदोलकांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

यापूर्वी जालना जिल्ह्यात अंबड येथे पहिला ओबीसी महाएल्गार मेळावा झाला होता. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यामधील टिकवाद वाढले. एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर आणि खालच्या स्तरावर टीका झाली होती.

आज हिंगोलीत दुसरा एल्गार

ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटना पुढे आल्या आहेत. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये पहिला ओबीसी एल्गार मेळावा झाला होता. त्यात भुजबळ यांनी जरांगेंवर जहरी टीका केली होती. दरम्यान, आता हिंगोलीत ओबीसींचा दुसरा एल्गार मेळावा आज रविवार (दि. २६) रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. मंत्री भुजबळ हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. रामलीला मैदानावर ही सभा आज पार पडणार आहे.

चांदवडमध्ये राहत्या घरात पती-पत्नीची आत्महत्या

स्वराज्य संघटनेने दिला इशारा

ओबीसींचा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे हिंगोली पोलिसांनी सभास्थळी तसेच नांदेड विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषणामुळे मराठा आंदोलकांची नाराजी ओढावून घेतलेली आहे.

आता भुजबळ ह्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भुजबळ मराठा आरक्षणाविरोधात नसल्याचे सांगत असले तरी मराठ्यांना ओबीसीत समावेश करण्यास त्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. तसेच मनोज जरांगे व छगन भुजबळ यांच्यातील वादामुळे सध्या राज्यात वातावरण पेटलेले आहे. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Crime news | सावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!