Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

0
1

Manoj Jarange |  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जरांगे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना रात्रीच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. रात्रंदिवस ते राज्यातील विविध कानाकोपऱ्यात जात, सभा घेत आहेत.

Nashik News | ग्रामसचिवालयांसाठी जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी उपोषण सोडलं होतं. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. आंदोलकांसोबत संवाद साधत असताना ते स्टेजवर कोसळले होते. त्यानंतर त्यांना आता पुन्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनोज जरांगे यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवले जाणार असून, त्यानंतर त्यांना सुट्टी दिली जाईल.

मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २४ डिसेंबरची डेडलाइन दिलेली आहे. यासाठी आता अवघा एक महिना उरलेला असताना जरांगे पाटील महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. दरम्यान, सभेत जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील मराठा व ओबीसी ह्या दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नाही म्हणून रात्रीही सभा व कार्यक्रम घेत बांधवांशी संवाद साधत आहोत.

पण, हे सरकार आमच्यावरच गुन्हे दाखल करतच आहेत. दुसरीकडे, छगन भुजबळ हे जातीय तेढ निर्माण होणारी वक्तव्य करीत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पण, आमच्या सभांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना पुढे केलंय. सरकारच छगन भुजबळांना पाठबळ देतंय का? यांच्या माध्यमातून सरकारलाच जातीय दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे.

OBC sabha | ओबीसी सभेला जाणाऱ्या भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here