Skip to content

Deola | खर्डे येथील किरण खैरनार यांना ‘उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्कार’


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  नाशिक येथील कृषिथॉनच्या प्रदर्शनात खर्डे (ता. देवळा) येथील यश कृषी एजन्सीला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कृषिथॉन नाडा उत्कृष्ट कृषी सेवा केंद्र ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे कृषिथॉन हे कृषि प्रदर्शन भरविण्यात आलेले असून, या प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कंपन्या, कृषी सेवा केंद्र आदींना प्रोत्साहित करून, सन्मानित करण्यात येत आहे.

दरम्यान, यात देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील खर्डे ह्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून यश कृषि सेवा केंद्राचे संचालक किरण खैरनार हे शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाबाबत योग्य मार्गदर्शन करतात.

Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

दरम्यान, त्यांच्या कार्याची दखल घेत कृषिथॉनने त्यांच्या कृषि सेवा केंद्राची ह्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. शनिवार (दि. २५) रोजी नाशिक येथे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते किरण खैरनार यांच्या यश कृषी सेवा केंद्राला संपूर्ण जिल्ह्यातून उत्कृष्ट कृषि सेवा केंद्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कृषिथॉनचे संजय न्याहारकर, नाडा चे उपाध्यक्ष अरुण मूळाणे, संचालक मंगेश तांबट, रमेश आहेर, बापू भामरे, मापदा चे संचालक जगदीश पवार, तालुका अध्यक्ष दिपक पवार, उपाध्यक्ष ताराचंद जाधव, कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी मान्यवर हे उपस्थित होते. खैरनार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळा तसेच खर्डे येथील शेतकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Nashik News | ग्रामसचिवालयांसाठी जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रस्सीखेच


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!