Crime News | नकार दिला म्हणून, मुलीच्या आई-बापाला जाळले; 22 वर्षानंतर आरोपी ताब्यात

0
1

Crime News |  मुंबईतील २२ वर्षांपूर्वी एका हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडले होते. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना एका चहाच्या दुकानामध्ये जिवंत जाळले. या प्रकरणी अखेर आता २२ वर्षांनी न्याय झाला आहे.

२००१ मध्ये कांदिवलीतील एका हॉटेलमधील अग्नीकांडात ४८ वर्षांच्या जहराबी व पती अब्दुल रहमान या दाम्पत्याची जाळून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील फरार आरोपी यशवंत बाबूराव शिंदे याला तब्बल २२ वर्षांनी अटक करण्यात दहिसर येथील क्राइम ब्रँचला यश मिळाले आहे.

यापूर्वी पोलिसांनी आरोपीचे सहकारी मोहिद्दीन शेख, नागनाथ तेलंगे व व्यंकट पाचवाड यांना अटक केली होती. पण, मुख्य आरोपी यशवंत शिंदेंला मात्र पोलिस अद्यापही शोधू शकले नव्हते. पण, आता २२ वर्षांनी तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

26 November |  संविधानाचा स्वीकार ते मुंबईवर हल्ला; आजच्या दिवशी काय घडलं..?

डीसीपी राजतिलक रौशन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुधीर दळवी व विजय रासकर, दिलीप तेजनकर आणि नवनाथ जगताप यांच्या पथकाने ही केस पुन्हा रिओपन करत मागील काही दिवसांपासून आरोपीच्या लातूर ह्या गावात शोधमोहिम राबवली होती.

तिथेच त्यांना आरोपी हा मागील काही दिवसांपासून पुणे येथील कोंढवा भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शुक्रवारी अटक केली.

Deola | खर्डे येथील किरण खैरनार यांना ‘उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्कार’


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here