यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची नावं समोर आली होती. दरम्यान, आता या यादीत आणखी दोन नावांचा समावेश झाला आहे आणि ते म्हणजे चांदवड-देवळा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा माजी केंद्रीय मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल आहेर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर.
Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा
विजय करंजकर शिंदे गटात जाणार..?
गेल्या दोन टर्मपासून ठाकरे गटाकडून तिकीटाच्या आशेवर असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना यंदाही डावलण्यात आले असून, त्यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे विजय करंजकर हे प्रचंड नाराज असून, राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर यांनी “आपण निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, आणि पाडणार पण” असे म्हटले होते. त्यामुळे ते एखादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करू शकतात. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास नाशिक लोकसभेची उमेदवारी त्यांनी दिली जाऊ शकते.
Nashik Loksabha | राहुल आहेरच का..?
तर, दुसरीकडे आमदार राहुल आहेर हे गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पक्षाचे चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या ११ हजार मतांनी तर, अपक्ष उमेदवार आत्माराम कुंभार्डे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. तसेच त्यांच्या मागे वडिलांचा राजकीय वारसा आणि ताकद देखील आहे. डॉ. दौलतराव आहेर हे गेल्या तीन दशकातील आक्रमक आणि झपाटलेला नेता व राजकीय झंझावात म्हणून ओळखले जात होते.
Nashik Loksabha | नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन
१९८५ यावर्षी ते नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९८९ साली ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांना राज्याचे आरोग्यमंत्रीपद देण्यात आले होते. देवळा तालुक्याची निर्मिती आणि वसंतदादा साखर कारखाना सुरू होण्यासाठी त्यांची आग्रही भूमिका होती. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, नाशिकमध्ये सर्व सोयीसुविधांयुक्त संदर्भ सेवा रुग्णालय यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष, मविप्र संस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी त्यांच्या राजकीत कारकिर्दीत भूषविली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम