Crime News | नागपुरमध्ये मद्यधुंद प्रेमीयुगलाने राडा घालून एकमेकांना मारहाण केली होती. यात मदतीसाठी आलेल्या तरुणीच्या मित्राने प्रियकरला पुन्हा मारहाण केली. या झटापटीत प्रियकराच्या हाताला गंभीर जखमी झाली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अचरज टॉवर परिसरात घडलेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दया (वय ५१) असे जखमीचे, तर सिमरन आणि तिचा मित्र जॉनी (सर्वांची नावे बदललेली आहे), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Crime News | देवळ्यात कुलूपबंद घरांचा फायदा घेत हजारोंची चोरी
दया हा बिल्डर आहे. गेल्या वर्षभरापासून दया हा सिमरनला ओळखत होता. २५ नोव्हेंबरला सिमरन ही तिची मुलं, नातेवाइक आणि दया सीताबर्डीतील मॉलमध्ये चित्रपट बघायले गेले होते. त्यापूर्वी दयाने मॉलसमोरील बारमध्ये दारू पिली होती. त्यानंतर दया हा सिमरन आणि तिच्या नातेवाइकांसोबत चित्रपट बघायला गेला. मध्यांतरात दया आणि सिमरनने बारमध्ये दारू प्यायली होती. चित्रपट संपल्यानंतर सिमरनचे नातेवाइक वेगळ्या वाहनाने घरी गेले. दया आणि सिमरन हे दोघे दुचाकीने जात होते. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि यावेळी तिने दयाला अचरज टॉवर परिसरात सोडण्यास सांगितले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोघेही या ठिकाणी आलेले होते. त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.
political news | भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्यानेत्याला अटक
यावेळी जॉनी तेथे आला होता. त्याने काय झाले? अशी विचारणा सिमरनला केली असता दयाने वाहनाने मला धडक दिल्याचे तिने सांगितले. त्यामुळे जॉनी याने दयाला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान दयाची सोनसाखळी आणि ब्रेसलेट गायब झाले. ते सिमरनच्या हातात दयाला दिसले व त्याने दागिने परत मागितले असता सिमरनने दागिने देण्यास नकार दिला.
दरम्यान, नागपुर पोलिस तेथे पोहोचले. तिघांना सदर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी सिमरनने दयाला दागिने परत केले. याप्रकरणी दयाने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी सिमरन आणि जॉनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही दया-सिमरनचा वाद झाला असून, हा वाद कपिलनगर तसेच जरीपटका पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम