political news | भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्यानेत्याला अटक

0
1

political news |  भरसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली होती. दरम्यान, दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीवरुन भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भा.द.वि कलम १५३(अ), १५३ (ब), १५३(अ)(१)सी, २९४, ५०४, ५०५(१)(क) या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भातच संजय राऊत हे स्वतः भांडुप पोलीस ठाण्यात जाणार आहेत. भांडूप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. पोलिस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

 का केली दत्ता दळवींना अटक?

भांडूप येथे रविवार (दि. २६) रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या कोकणवासीय पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळीच आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. दरम्यान, आजच त्यांना कोर्टात हजरही केले जाणार आहे.

MPSC 2022 | राज्यसेवेची नाशकात मुलाखत; निवड प्रक्रिया आली अंतिम टप्प्‍यात

 प्रकरण काय ?

शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांसाठी जाहीर मेळाव्याचे आयोजन केलेले होते. या मेळाव्यात राजस्थान प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावापुढे लावलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवी यांनी भरसभेट शिवीगाळ केली.

कुठल्याही सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात दळवींविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांना आजच कोर्टात हजरदेखील करण्यात येणार आहे.

Gold Silver rate | सोन्याने मोडला रेकॉर्ड; असे आहेत आजचे दर..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here