Skip to content

Crime News | देवळ्यात कुलूपबंद घरांचा फायदा घेत हजारोंची चोरी


सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | बंद घरं सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने एक-दोन दिवस घरं कुलूपबंद दिसली की अशा घरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. येथील ज्ञानेश्वर नगरात सोमवार (दि. २८) च्या पहाटेच्या सुमारास बंद घराचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी 71 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे. तुषार सोनवणे यांनी याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. (Crime News)

political news | भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्यानेत्याला अटक
ज्ञानेश्वर नगरात राहणारे तुषार सोनवणे हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते. या कुलुपबंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश करत ५० हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, १७ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी आणि तीन हजार रुपये रोख असाल एकुण ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

MPSC 2022 | राज्यसेवेची नाशकात मुलाखत; निवड प्रक्रिया आली अंतिम टप्प्‍यात
या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!