Skip to content

political news | नारायण तातू राणे व त्यांची दोन नेपाळी मुलं; राऊतांचा राणेंवर हल्लाबोल


political news | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. नालायक या शब्दावरुन राज्याचे राजकारण हे तापलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना जशी अटक झाली होती, तशी उद्धव ठाकरेंनाही अटक होणार का? अशी चर्चा रंगली होती. आता नारायण राणेंच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, त्याशिवाय त्यांच्या मुलांवरही त्यांनी निशाणा साधलाय.

काही दिवसांआधीच येथे नारायण तातू राणे हे आले होते. येथे त्यांनी जोरदार भाषण केले, माझ्यावर शिवीगाळ केली, गुन्हा दाखल का केला नाही? अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. गुन्हा दाखल केला का? मंत्री आहेत म्हणून कारवाई नाही? भाजप व गद्दार गटाचे असे कित्येक नेते शिव्या देतात. त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत. त्यांना अटक का नाही? पण दत्ता दळवी यांनी फक्त जनभावना व्यक्त केली. तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली, असा संताप यावेळी राऊतांनी व्यक्त केला.

Crime News | देवळ्यात कुलूपबंद घरांचा फायदा घेत हजारोंची चोरी

नारायण तातू तुम्ही कुठे असाल?

आदित्य ठाकरे व तुम्हाला अटक होणार असे नारायण राणे म्हणतात. यावर संजय राऊतांनी राणेंचा समाचार घेतला.  राऊत म्हणाले, “नारायण तातू राणे २०२४ मध्ये तुम्ही कुठे असाल? याचा विचार करा. नारायण तातू राणे व त्यांची दोन्ही नेपाळी मुलं हे खुलेआम शिव्या देतात. कोणत्याही शब्दाचा वापर करतात. त्यांच्यावर कारवाई का नाही. आमच्या कार्यकर्त्यावर लगेच कारवाई केली जाते. तुम्ही कितीही जुलूम करा, २०२४ मध्ये जेलमध्येच जाणार, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी नालायक म्हटले तर, त्यात काय चुकीचं आहे. नालायकाला नालायक नाहीतर काय म्हणायचं? हे सरकार नालायक आहेच, तर नालायकच म्हणणार. देशात काय सेन्सारशीप लागली आहे का? नालायकला नालायकही म्हणू शकत नाही, तर डिक्शनरीमधून हा शब्दच हटवा, असे राऊत यावेळी म्हणाले.

राज्यात अवकाळी पाऊस आणि त्यामुए निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे गद्दार हृदयसम्राट मुख्यमंत्री व त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे प्रचाराला बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर जी टीका होतेय. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी त्यांनी दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही सर्व दत्ता दळवी यांच्या पाठीशी आहोत. आम्ही सर्वजण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतो.

political news | भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्यानेत्याला अटक

‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत शिंदेंवर हल्लाबोल 

गद्दार हृदयसम्राट हे स्वत:ला “हिंदूहृदयसम्राट” म्हणून घेतात. हा वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदेंवरही गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाहीये, एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा. ते वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी स्वत:ला लावून घेत आहेत.

पुढे ते म्हणाले की, “आज आनंद दिघे असते तर. ह्या गद्दारांना चाबकाने फोडलं असतं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला आहे. हा  शब्द धर्मवीर ह्या चित्रपटातही आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे. सेन्सरने तो शब्द का हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर, चित्रपटाच्या कलाकार, आणि निर्मात्यांवरही गुन्हा दाखल का केला नाही? तोच शब्द जर दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते?

MPSC 2022 | राज्यसेवेची नाशकात मुलाखत; निवड प्रक्रिया आली अंतिम टप्प्‍यात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!