Nashik | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील ड्रग्स प्रकरण चांगले चर्चेत आलेले आहे. ड्रग्ज प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतो आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चा निघाला होता. याचसाठी पदाधिकाऱ्यांकडुन जय्यत तयारी करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे नाशिकला आले असता त्यांनी पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय हे राजरोसपणे हा सर्व प्रकार चालु शकत नाही असा आरोप केला होता. त्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्यांनी ठाकरे गट यावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर आज ठाकरे गटाचा मोर्चा निघाला होता. शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयापासून हा मोर्चा मध्यवर्ती भागातून हा मोर्चा रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, असे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितलेले आहे.
तिसरी मुंबई! मेगा प्लान झाला तयार; रस्त्यांसाठी 12 हजार कोटींची तरतुद
मोर्चात सहभागी महिलांना मोर्चा का हेच ठाऊक नाही..
आज उद्धव ठाकरे गटाकडून नाशिक शहरात ड्रग्स प्रकरण विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या अनेक लोकांना हा मोर्चा का काढण्यात आला आहे याची कल्पना देखील नव्हती. जेव्हा एका पत्रकाराने या मोर्चात सहभागी झालेल्या काही महिलांना मोर्चा संदर्भातील प्रश्न विचारले असता त्यावेळी त्या महिला आम्हाला मोर्चा का आहे याची कल्पना नाही असे उत्तर दिले. या संदर्भातील व्हिडीओ आता मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. नाशिक मधील उद्धव ठाकरे गटाच्या या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र या मोर्चातील या व्हिडीओ मुळे मोर्चाचा मूळ हेतूच लोकांना माहित नसताना हे लोक या मोर्चात नक्की का सहभागी झाले? किंवा हे लोक मोर्चासाठी भाडोत्री आणले होते का ? असे प्रश्न आता सामान्य जनतेकडुन उपस्थित होत आहे.
या मोर्चावेळी खासदार संजय राऊत नक्की काय म्हणाले ?
नाशिक हि तीर्थ क्षेत्र आणि सावरकरांची भूमी होती आता हि ड्रग्स माफियांची भूमी झालेली आहे. मोर्चाचं हे विराट रूप पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी यायला हवं होतं असा म्हणत संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधला. हा विषय नशेच्या बाजाराचा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या विळख्यात आत्महत्यादेखील केली आहे. मात्र गृहमंत्री यावर राजकारण करत आहेत. ड्रग्स प्रकरणात जो पकडला गेला याचे पुरावे जगाला माहिती आहे. शासन छोट्या भाभीची चौकशी करेल पण, मोठ्या भाभीचे काय? असा थेट सवाल देखील संजय राउतांनी केला आहे. तसेच इथल्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना काय हफ्ता जात होता का? हे पोलीस रेकॉर्ड वर आलेलं आहे असा घणाघाती आरोप देखील संजय राऊतांनी नाशिकमधील मोर्चाच्यावेळी बोलताना केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम