तिसरी मुंबई! मेगा प्लान झाला तयार; रस्त्यांसाठी 12 हजार कोटींची तरतुद

0
3

Mumbai | मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई म्हणून उदयास येणाऱ्या पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. ‘नैना’ क्षेत्र असलेल्या 23 गावांचा लवकरात लवकर विकास व्हावा यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.  तसेच येत्या महिनाभरात या कामांचे टेंडर काढले जाणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सिडको रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करणार असल्याचे सिडकोचे MD अनिल डिग्गीकर यांनी सांगितले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको ‘नैना’ योजनेअंतर्गत करणार आहे.  या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुध्दा ओळखले जाईल. रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसरात सिडको ‘नैना’ योजनेतून भविष्यात विकास करणार असले तरी सध्या पहिल्या टप्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Deola| खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड…

12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात होणार

‘नैना’ क्षेत्रातील विकासकामे वेगाने होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ‘नैना’ प्रकल्पाला विरोध करत आहेत. कारण सिडकोकडून नविन क्षेत्राचा विकास होताना एकसाथ न होता तुकड्या-तुकड्यात केला जातो. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या भुखंडांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे या गोष्टींवर विशेष लक्ष देत सिडको आता ‘नैना’ भागातील 12 नोडची विकासकामे टप्याटप्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीला काम दिलेले आहे. एकदा आराखडा तयार झाला की पुढील महिनाभरात सिडको टेंडर काढून कामं हाती घेणार आहेत. या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारण बारा करोड रूपये खर्च अपेक्षित आहे.

Devendra Fadnavis| कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा, दाखवले पुरावे आणि ‘मविआ’ चे धाबे दणाणले?

चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते तयार करणार

‘नैना’ क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच TPS  योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. या ठिकाणी रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरळ असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाईल. याच कारणामुळे चौक तसेच सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here