Skip to content

Deola| खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड…


Deola|  देवळा तालुक्यातील खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री. बाजीराव महादू सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खालप ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच कांताबाई पिंपळसे यांनी आवर्तन ह्या पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ह्या रिक्त पदासाठी दी. २० ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता खालप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. विमल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती.

यावेळी रिक्त उपसरपंच ह्या पदासाठी बाजीराव सूर्यवंशी यांचा निर्धारित वेळेपर्यंत एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची उपसरपंच ह्या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांना सूचक म्हणून सुनील सूर्यवंशी यांनी स्वाक्षरी केली आहे.
यावेळी सरपंच विमल सूर्यवंशी , सदस्य सुनील सूर्यवंशी ,बेबीबाई सूर्यवंशी , कांताबाई पिंपळसे , हिरामण पवार ,मुरलीधर अहिरे ,विजया देवरे , ग्रामविकास अधिकारी सुदर्शन बच्छाव आदी उपस्थित होते . नवनिर्वाचित उपसरपंच बाजीराव सूर्यवंशी यांचे भाजपचे नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते केदा नाना आहेर , वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे ,बाजार समितीचे सभापती योगेश आहेर , शेतकी संघाचे चेअरमन कैलास देवरे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचाळीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी  प्रशांत सूर्यवंशी ,साहेबराव सूर्यवंशी,अविनाश सूर्यवंशी ,जिभाऊ सूर्यवंशी , राकेश सूर्यवंशी, दिनेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते, उपस्थितांनी यावेळी त्यांचे अभिनंदनही केले .

Devendra Fadnavis| कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा, दाखवले पुरावे आणि ‘मविआ’ चे धाबे दणाणले?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!