Ajit Pawar| नेहमीच मिश्किल अंदाजात पत्रकारांना उत्तरं देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा पत्रकारांवर भडकले आहेत. पुण्यात विविध विभागाच्या आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांसोबत बोलताना अजित दादा भडकल्याचं बघायला मिळालं आहे.यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना कंत्राटी भरतीविषयी प्रश्न विचारला होता. पण, नुकतंच काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी या विषयी सगळी माहिती दिली होती. त्यामुळे सारखे तेच तेच प्रश्न विचारु नका आणि महत्वाचं म्हणजे कोणता नेता किंवा आमदार काय बोलला आणि त्यावर तुमचं म्हणण काय? हे तर अजिबात विचारु नका असे खडसावत अजित पवार पत्रकारांवर चांगलेच भडकले होते.
पण यादरम्यान, ललित पाटील प्रकरणावर अखेर अजित पवारांनी मौन सोडले आहे. ते यावेळी म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार आहे. पोलिस यंत्रणा चौकशी करण्याचे काम चोखपणे करत आहेत. न्यायालयात त्यांना हजारही केले होते. ललित पाटीलची आणि त्याच्याशी संबंधित सर्वांचीच चौकशी होणार आहे. गृहमंत्र्यांनी तसे संकट निर्देशदेखील दिले आहेत, या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण, चौकशीतून सगळे खरं के ते समोर येईलच.
सध्या सगळीकडे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी त्यावरदेखील अजित पवारांनी उत्तर दिले आहे. पण, यावर काही स्पष्ट उत्तर न देता. ते प्रश्न टाळतांना ‘वेळ आली की सगळं बघू’, असे म्हणाले.
तिसरी मुंबई! मेगा प्लान झाला तयार; रस्त्यांसाठी 12 हजार कोटींची तरतुद
बैठकीत काय झालं?
नीरा डावा कालवा आणि नीरा उजव्या कालव्याचे रब्बीचे आवर्तन १० नोव्हेंबरपासून सोडावेत असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला गेला. कालव्याच्या शेवटच्या भागात योग्य दाबाने पाणी जाण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करणे गरजेचे आहे. पाणीपट्टीची थकबाकी वसूल करुन त्यातून दुरुस्तीची कामे करावीत. पाण्याच्या चोरीचे प्रकार टाळण्यासाठी सिंचन विभागाच्या मदतीला पोलीस बंदोबस्त दिल जाईल. कालव्यालगत गरजेनुसार भारनियमन करावे, असेही अजित पवार म्हणाले. नीरा उजवा कालव्यासाठी यावर्षी ३.५ टीएमसी पाणी हे कमी आहे. त्यामुळे याबद्दल योग्य नियोजन करावे. पण हे करत असताना सर्व चाऱ्या व उपचाऱ्यांना न्यायी पद्धतीने पाणी मिळेल याचीही काळजी घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले. याबरोबरच कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून आगामी काळात किती पाऊस पडतो याआधारे या वेळापत्रकात कमीजास्त बदल करण्यात यावा,अशा निर्देशही त्यांनी यावेळी केले.
Nashik News| ललित पाटीलकडून ‘मातोश्री’ वर हप्ते जात होते का? ; देवयाणी फरांदेंचे घणाघाती आरोप…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम