Skip to content

Nashik News| ललित पाटीलकडून ‘मातोश्री’ वर हप्ते जात होते का? ; देवयाणी फरांदेंचे घणाघाती आरोप…


Nashik News :  नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता थेट विधानसभेपर्यंत पोहोचल्याचे आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ड्रग्जच्या अवैध काळ्या धंद्यांविरोधात ठाकरे गटाने आज नाशिक शहरात विराट मोर्चाचे आयोजन केले असून, ह्या मोर्चावर महायुती सरकारच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी खडसावून टीका केली आहे.

“संजय राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत? किंवा मग सकाळी उठल्यावर तेच ड्रग्ज घेत असावेत अशी शंका आता महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. रोज सकाळी उठायचे आणि कोणावरही बेछूट आरोप करायचे. संजय राऊत यांचे सगळे आरोप हे नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना आणि ललित पाटीलचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरचे आहेत.ललित पाटील हा आधी शिवसेनेचा कार्यकर्ता होता. आणि त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा किती ड्रग्स तस्करांवर कार्यवाही  झाली, असा सवालही देवयानी फरांदे यांनी संजय राऊतांना उद्देशून केला आहे.

तेव्हा ललित पाटीलकडून “मातोश्री” वर किंवा संजय राऊतांना हप्ते जात होते का? याची आधी चौकशी गृहखात्याने करावी. ललित पाटील पकडला गेल्याने संजय राऊत यांचे मोठे नुकसान झाले आहे, म्हणून त्यांची तडफड होत आहे. संजय राऊत यांचीच आधी नार्को टेस्ट करा, अशी खोचक मागणीही देवयानी फरांदे यांनी केली आहे.

Virat Kohli | सचिन तेंडुलकरचे ‘हे’ रेकॉर्ड तोडण्याच्या मार्गावर किंग कोहली

खोके सरकार नशेच्या बाजारात गुंतलंय का? – संजय राऊत. 

हे सरकार नशेच्या बाजारात गुंतलंय का? हे खोके सरकार आहेत. आणि यांनी खोके भरण्याचा वाटा या नशेच्या व्यापाऱ्यांना दिलाय का? अशी शंका येत आहे. हे सगळं लवकर थांबलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही. ड्रग्ज प्रकरणात किती आमदारांना हप्ता मिळायचा याची माहितीच संजय राऊत यांनी यावेळी  दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी संजय राऊत हे आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी मध्यमांसोबत संवाद साधताना हे आरोप केले आहेत. काल मला पोलीस सूत्रांनी एक कागद आणून दिला. त्यात ड्रग्ज प्रकरणात कुणाला किती हप्ता जातो याचे आकडे होते. ते आकडे बघून मलाच धक्का बसला. त्यापैकी एका आमदाराला तर चक्क १६ लाखांचा हप्ता मिळतो. आणि असे आणखी सहा आमदार आहेत. हे प्रकरण  साधं नाही. फडणवीसांनी जास्त शाहजोगपणा करू नये. स्वतःची प्रतिष्ठा सांभाळावी. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असा खोचक टोलाच संजय राऊतांनी यावेळी नाशिकच्या आमदारांना आणि फडणवीसांना यावेळी लगावला.

Virat Kohli | सचिन तेंडुलकरचे ‘हे’ रेकॉर्ड तोडण्याच्या मार्गावर किंग कोहली


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!