Nashik | नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विराट मोर्चा; जाणुन घ्या कसा असेल मार्ग 

0
3

Nashik | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील ड्रग्स प्रकरण चांगले चर्चेत आलेले आहे. ड्रग्ज प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतो आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चा निघणार असून पदाधिकाऱ्यांकडुन जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नाशिकजवळील शिंदे-पळसे गावातील अमली पदार्थ प्रकरण आता राज्यभर गाजत असून धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणुन होऊ लागली आहे. नाशकात पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिंदे गावात ड्रग्ज निर्मिती केली जात होती. गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकसह राज्यभरात हे ड्रग्ज पोहचवले जात होते. यातील मुख्य संशयित ललित पाटील हाच यामागील सूत्रधार असल्याचे देखील उघडकीस आले आहे. ललित पाटील एका गुन्हयांखाली तुरुंगात होता. परंतु, आजारपणाचे कारण सांगून मागील काही महिन्यापासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. विशेष म्हणजे रुग्णालयातुनच तो ड्रग्जचे व्यवहार देखील करत असल्याची माहीती समोर आल्याने खळबळ उडाली. त्यातच त्याने ससून रुग्णालयात पळ काढला आणि नाशिकला मुक्कामही केला. त्यामुळे हे सर्व सुरु असताना नाशिकमधील कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे, याचा अंदाज लागेल.  याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे.

Maratha Reservation| आरक्षणाच्या लढाईत आणखी एका मरठ्याचा बळी..; सरकार आणखी किती मराठ्यांचे बळी घेणार..?

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे नाशिकला आले असता त्यांनी पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय हे राजरोसपणे हा सर्व प्रकार चालु शकत नाही असा आरोप केला होता. त्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्यांनी ठाकरे गट यावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयापासून निघणार असून मध्यवर्ती भागातून हा मोर्चा रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, असे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितलेले आहे. नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊतांच्या  नेतृत्वाखाली 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिक काँग्रेसने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केलेले होते. यानंतर आज ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याने इतर पक्ष सहभागी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

crime news | 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

… तर प्रशासकीय कारवाई होईल

ड्रग्स माफिया ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक शहरात ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याचे पोलीस तपासत उघडकीस आले आहे. मुबंई, पुणे पोलीस हे नाशिकमधे येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलीसांना त्याची माहीती नसल्याने पोलिसांची निष्क्रियतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, नाहीतर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा देण्यात आलेला आहे.  नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रक काढलेले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना असे निर्देश दिले आहेत.  विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचे MIM पक्षाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्याच निवेदनाची दखल घेण्यात आलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here