Skip to content

Maratha Reservation| आरक्षणाच्या लढाईत आणखी एका मरठ्याचा बळी..; सरकार आणखी किती मराठ्यांचे बळी घेणार..?


Maratha Reservation| सरकारला देण्यात आलेली मराठा आरक्षणासंबंधीची डेडलाईन संपत आलेली असताना आरक्षणासाठी आणखी एका व्यक्तीने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. सुनील कावळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल रात्री त्याने जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून एक चिठ्ठीदेखील लिहिलेली असल्याची माहिती समोर आली होती.

त्यात आरक्षणाविषयीची तळमळ त्याने व्यक्त केलेली आहे. या घटनेमुळे मराठा समाजात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाजवळ काल रात्री १ वाजेच्या दरम्यान त्याने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याने जीव सोडला होता. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. ही चार पानी चिठ्ठी त्याने मनोज जरांगे यांना उद्देशून लिहिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

crime news | 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

सुनील कावळे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. ते जालन्याला मनोज जरांगे यांच्या सभेसाठी दोन दिवस आधीच उपस्थित होते. सुनील कावळे हे मूळचे जालन जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अंबड तालुक्यातील चिकणगाव हे त्यांचे मूळ गाव होते. मात्र गेल्या १० ते १५ वर्षापासून ते संभाजीनगरच्या राजनगरमधील मुकुंदवाडी परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, बहीण, दोन पुतणे, भावजाय असा परिवारदेखील आहे.

मी नसेल तरीही, आपल्याला आरक्षण मिळेलच…

सुनील कावळे हे नेहमी त्यांच्या कुटुंबीयांना म्हणायचे की, आपली परिस्थिती बिकट आहे. ते मुलाला म्हणायचे तुझा पॉलिटेक्निक कॉलेजला नंबर लागला. पुढच्यावेळी इंजिनियरिंग कॉलेजलाही प्रवेश मिळेल. आपल्याला आरक्षण मिळेल. मी नसेल पण तरीही आरक्षण मिळेल, असं ते मुलाला नेहमी म्हणायचे असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

 यांना आमची तळमळ कधी दिसेल?

मी आरक्षण मिळवून देईलच असं त्यांचं म्हणणं होतं. दोन दिवसांआधीच मनोज जरांगेच्या सभेसाठी ते आंतरवालीलाही गेले होते. कामाला जायचंय असं सांगून ते मुंबईला गेले. कामाला जातो असं सांगून ते मुंबईला गेले. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. १० ते १५ वर्षापासून संभाजीनगरला स्थायिक होते. ते ड्रायव्हरचे काम करत होते, असं त्यांच्या जावयाने सांगितलेलं आहे. सरकारला जाग आली पाहिजे. ४८ पेक्षा अधिक मराठा तरुणांनी आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले आहे. आज आणखी एक बळी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलाय. नेमकं काय केलं म्हणजे यांना आमची वेदना कळेल? चार चार मुख्यमंत्री येऊन गेले. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या. अशी मागणीही त्यांनी यावेळी

Onion News | शेतकरी ऑक्सिजनवर…! कांद्याच्या बैठकीत कमालीची गुप्तता..

चिठ्ठीत काय म्हटलंय ?

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मी सुनील बाबुराव कावळे, मुं. पो. चिकणगाव, ता. अंबड, जि. जालना “एकच मिशन मराठा आरक्षण”. “एक मराठा लाख मराठा”. “साहेब… आता कुण्या नेत्याच्या सभेला जायचं नाहीये. २४ ऑक्टोबर हा आरक्षणाचा दिवस. लवकर या मुंबईमध्ये. आता माघार घ्यायची नाही. कुणीही काहीही बोलूदेत, त्यांच्याकडे लक्ष देवूच नका. त्यांचं नाव तोंडातून काढूही नका. ऊठ मराठा जागा हो… पण, लक्षात ठेवा शांततेत यायचं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा हा गंभीर प्रश्न आहे. (Maratha Reservation)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!