Onion News | शेतकरी ऑक्सिजनवर…! कांद्याच्या बैठकीत कमालीची गुप्तता..

0
11

Onion News | कांदादरात पुन्हा तेजी येताच केंद्र सरकार उपाययोजना करण्यासाठी तसेच वाढते दर,  ग्राहकांची मागणी,  नाफेड आणि एनसीसीएफकडे उपलब्ध कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. १८) दिल्लीत आढावा बैठक घेतल्याचा दावा कांदा व्यापाऱ्यांनी केला. परंतु, या बैठकीत काय निर्णय झाला, याची माहिती नसल्याचा दावा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे बैठकीबाबत आणि कांद्याबाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण,  मिझोरम विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या परिस्थितीत कांद्याच्या वाढत्या दराचा मुद्दा प्रकाशझोतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने केंद्राकडून पावले उचलले जात असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे.

Maharashtra politics| जयंत पाटील धरणार अजित पवार गटाची वाट..?
नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून कांदा आवक घटल्याने दरात क्विंटलमागे थेट 800 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारीही कांदा आवक कमीच असल्याने दरात पुन्हा दीडशे रुपयांनी वाढ होऊन क्विंटलला 3700 रुपये दर गेले होते. आवक वाढू नये म्हणून शेतकरीदेखील टप्प्या-टप्प्याने कांदा विक्रीला आणत आहे.  3611 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेत केंद्र सरकारने कांदा दरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. कांद्याच्या प्रमुख उत्पादक 10 राज्यांमध्ये लागवडीतील घट उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख 96 हजार हेक्टर इतके प्रचंड आहे. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात खरिपात 11 हजार, तर लेटखरिपामध्ये आतापर्यंत 40 हजार हेक्टर अशी एकूण 51 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झालेली आहे.

Marriage news: धक्कादायक ! गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर करताय बलात्कार

तुर्कस्तान, पाकिस्तानचा कांदा संपलेला असताना अफगाणिस्तानात भूकंपामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे आखाती देशात कांद्याची मागणी वाढली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी पुढचा महिना उजाडेल असं दिसत आहे. त्यामुळे तूर्तास भारतीय कांद्याला आखाती देशातून चांगली मागणी राहणार असल्याने कांदा दराने उसळी मारण्यास सुरु केलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here