Maharashtra politics| जयंत पाटील धरणार अजित पवार गटाची वाट..?

0
24

Maharashtra politics| राष्ट्रवादी काँग्रेस फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकांचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या  संपर्कात असल्याचा दावा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. काही दिवसांतच अजित पवार गटाच्या आमदारांचा आकडा हा ५३ वर जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धर्मरावबाबा आत्राम  म्हणाले, शरद पवार गटाचे जे नेते दावा करत फिरत आहे की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहे. मात्र दावा करणारेच जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात  आहे. आमच्या गटाच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी अजित पवार हे आमदाराची बैठक घेतात. त्याच्या समस्या , मतदार संघातले ऐकून घेतात. हे आधी होत नव्हतं म्हणून सर्व आमदारांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व आमदार अजित पवार गटात येऊन खूश आहेत.

Marriage news: धक्कादायक ! गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर करताय बलात्कार

आकडा ५३ वर जाणार 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे काही आमदार हे आमच्या संपर्कात असून लवकरच आमच्या गटाच्या आमदारांचा आकडा हा ५३ वर जाणार आहे. आमची लोकसभेसाठी   मिशन ४५ ची तयारी सुरु झाली असून मी गडचिरोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्या तयारीसाठी आम्ही कामाला देखील लागल्याचेही धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी सांगितले.

Marriage news: धक्कादायक ! गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर करताय बलात्कार

काय म्हणाले होते जयंत पाटील?

अजित पवार गटातील १५ आमदार आमच्या संपर्कात असून अनेक जणांना परत साहेबांसोबत येण्याची इच्छा आहे. याबाबत त्यांच्यासोबत बोलणेही सुरु आहे. पण, अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या  शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. अजित पवारांनी जुलैमध्ये बंड करत शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले, आणि यानंतर दोन गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोग तसेच सुप्रीम कोर्टाच्या दारापर्यंत पोहचला. दरम्यान,आता जयंत पाटील यांनी केलेला हा दावा अजित पवार गटाकडून फेटाळण्यात आला असून, आत्राम यांच्या दाव्यानंतर शरद पवार गटाकडून आणि विशेषतः जयंत पाटलांकडून कोणती प्रतिक्रिया येते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra politics)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here